Atal Bihari  Vajpayee
Atal Bihari Vajpayee 
देश

सेंट्रल हॉलमध्ये झळकले वाजपेयींचे तैलचित्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : "वर्तमान के मोह जाल में आनेवाला कल ना भुलाए। आओ मिलकर दीया जलाए।।' असा समर्थ विश्‍वास प्रकट करणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य तैलचित्र संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आज (मंगळवार) झळकले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, विरोधी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी आदींच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाजपेयींच्या या चित्राचे अनावरण केले. 

अटलजींचे चित्र दिल्लीच्या लोक अभियान संस्थेने संसदेला भेट म्हणून दिले असून, वृंदावनचे ज्येष्ठ चित्रकार, पद्मश्री क्रिशन कन्हाई यांनी अटलजींचे चित्र चितारले आहे. 
संसद व संसदीय परिसर हा लोकसभा सभापतींच्या अधिपत्याखाली असतो. तेथील चित्रे व पुतळे याबाबत लोकसभेची चित्रविषयक समिती सारे निर्णय घेते. सध्या सुमित्रा महाजन या समितीच्या अध्यक्षा आहेत व त्याच आजच्या कार्यक्रमाच्या यजमान होत्या.

अधिकृत आकडेवारीनुसार संसद परिसरातील दालनांमध्ये सध्या 23 नेत्यांची तैलचित्रे व 49 पुतळे आहेत. पुतळ्यांमध्ये महात्मा गांधी, त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले, देशात सामाजिक न्यायाच्या स्थापनेसाठीचे पुरस्कर्ते फुले-शाहू-आंबेडकर ही त्रयी, छत्रपती शिवाजी महाराज, नेहरू-गांधी घराण्याचे पंतप्रधान आदींचा समावेश आहे. गोलाकार सेंट्रल हॉलमध्ये गांधीजींसह लाल-बाल-पाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रवींद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींची तैलचित्रे आहेत. मनोहर जोशी यांच्या सभापतिपदाच्या काळात गांधीजींच्या बरोबर समोर सावरकरांचे चित्र लावण्याचा प्रसंग चर्चेत राहिला होता. 

'हे लोकांचे दुर्दैव' 
राज्यसभेत गेल्या दहा दिवसांप्रमाणे अकराव्या दिवशीही गोंधळामुळे कामकाज चालू शकले नाही. या गोंधळामुळे वरिष्ठ सभागृहात राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चा व पंतप्रधानंचे उत्तर हेदेखील होण्याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी या सततच्या गोंधळामुळे संतप्त होऊन "सभागृहाचे कामकाज गोंधळामुळे अजिबात न चालणे हे (आपल्याला निवडून देणाऱ्या) लोकांचे दुर्दैव आहे,' असे हताश उद्‌गार काढले व कामकाज तहकूब केले. 

संसद दालनांत... 
23 
नेत्यांची तैलचित्रे 

49 
पुतळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: कर्णधार ऋतुराजचं शानदार अर्धशतक; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटलाही टाकलं मागे

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT