Narendra Modi esakal
देश

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अयोध्येत 'रोड शो'; हे आहे कारण

Narendra Modi:

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi: अयोध्येतील राममंदिराच्या उद्‌घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.

राम मंदिराचे उद्‌घाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे. मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्‌घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे.

विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीशकुमार यांनी सांगितले. रोड शोच्या मार्गावर विविध ५१ ठिकाणी मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध साधूसंत पंतप्रधानांना आशीर्वाद देतील. रेल्वे स्थानक ते विमानतळ या मार्गावरील पाच किलोमीटरच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होईल.

रेल्वे स्थानकावर मोदींच्या हस्ते वंदे भारत आणि अमृत भारत या दोन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. यानंतर मोदी पुन्हा रस्ते मार्गाने विमानतळावर जाणार असून विमानतळाच्या नजीकच आयोजित केलेल्या सभेत सहभाग घेणार आहेत. अयोध्येसाठीचे पहिले विमान दिल्लीहून सकाळी दहा वाजता उड्डाण करून अयोध्येत सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT