Prostitution business in goa in bungalow three gilrs are rescued
Prostitution business in goa in bungalow three gilrs are rescued 
देश

गोव्यात बंगल्यामध्ये वेश्या व्यवसाय; तीन तरुणींची सुटका 

सकाळवृत्तसेवा

पणजी (गोवा) - मजलावाडा - हरमल येथील एकमजली बंगल्यावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने छापा टाकून वसईतील दलाल मैना नायक ऊर्फ तब्बसूम मुसैद अली (35) हिला वेश्या व्यवसाय चालवित असल्याप्रकरणी अटक केली. फ्लॅटवरील तिघा तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. 

हरमल येथील एका बंगल्यामध्ये वेश्या व्यवसायासाठी परराज्यातील तरुणींना आणून ठेवण्यात आले अाहे व तेथेच देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे निरीक्षक विश्वेस कर्पे यांना मिळाली होती. त्यानुसार काल 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कर्पे यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँचने बोगस ग्राहक पाठवून हा छापा टाकला. त्यावेळी फ्लॅटमध्ये वेश्या दलाल मैना ऊर्फ तब्बसूम व तीन तरुणी होत्या. या तरुणी मुंबईतील सायन, मुंब्रा व अहमदनगर येथील आहेत. नोकरीचे आमिष दाखवून त्याना देहविक्री करण्यास प्रवृत्त करण्यात येत होते व संशयित त्यांच्या मिळकतीवर हा व्यवसाय करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज संध्याकाळी संशयित दलाल मैना हिला पेडणे न्यायालयात पोलिस कोठडीसाठी उभे केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : हातकणंगलेतून धैर्यशील माने 14723 मतांनी विजय; सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पराभव

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : विखेंना मोठा धक्का! नगरकरांनी दिली निलेश लंकेंना दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी

Buldhana Constituency Lok Sabha Election Result: बुलडाण्यात तुपकरांचा ठाकरेंना झटका; शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विजयी

Hatkanangale Constituency Lok Sabha Election Result: आबांचा खेळ शेट्टींनी बिघडवला! हातकणंगलेत धैर्यशील मानेच खासदार

SCROLL FOR NEXT