Congress President Election 2022 esakal
देश

Congress : गांधी घराण्यातील अध्यक्ष नको असं राहुल गांधींच म्हणालेत; गेहलोतांचा मोठा गौप्यस्फोट

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच CM गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच CM गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election 2022) पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळं अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेकांची नावं चर्चेत आली आहेत.

सध्या या शर्यतीत अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि शशी थरूर (Shashi Tharur) यांची नावं आघाडीवर आहेत. तर, दुसरीकडं राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अनेक नेते आग्रही आहेत. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा विजयाचा मार्ग काय असावा त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, आता राहुल गांधींबाबत अशोक गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

'लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार'

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गांधी घराण्यातील कोणीही पुढील पक्षाध्यक्ष होऊ नये, असं स्पष्ट केलं होतं. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राहुल गांधींनी माहिती दिल्याचं सांगत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी केरळमध्ये माध्यमांना संबोधित करताना गेहलोत म्हणाले, ‘मी त्यांना (राहुल गांधींना) अनेक वेळा विनंती केली आहे की, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव स्वीकारावा. त्यांनी स्पष्ट केलं की गांधी घराण्यातील कोणीही पुढील प्रमुख बनू नये.’ आपण लवकरच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं गेहलोत यांनी स्पष्ट केलं. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता विरोधी पक्ष मजबूत होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतरही उमेदवार जाहीर, आता माघारीसाठी काँग्रेसनं ठेवलीय अट

Akola News: अकोट ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत अवैध दारू विक्रीवर मोठा हल्ला; लाखभर मुद्देमाल जप्त

Akola News: राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात; ओव्हरलोड ट्रकची उभ्या ट्रकला धडक; दोन चालक गंभीर जखमी

Akola News: मुख्य बाजारपेठेला अतिक्रमणाचा विळखा; गल्लीबोळांतही बिनधास्त अतिक्रमण ;प्रशासन विभाग सुस्त

Akola News: आरटीओ विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिक हैराण; परवाना मिळेनाः एचएसआरपी नंबर प्लेटसाठी विलंब

SCROLL FOR NEXT