Rajasthan Election Result Esakal
देश

Rajasthan Election Result: अजूनही काँग्रेस करू शकते कमबॅक? या 15 जागा ठरणार किंगमेकर

राजस्थान निवडणुकीच्या निकालात भाजप सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. अशा परिस्थितीत त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही अपक्ष आमदारांचीही गरज भासू शकते. राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर अशा १५ जागा आहेत ज्यांचे विजयी उमेदवार किंग मेकर ठरतील.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार भाजप बहुमताच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. राजस्थानच्या विधानसभेच्या १९९ जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून भाजप आघाडीवर दिसत आहे.

आता अशा स्थितीत राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर अशा १५ जागा आहेत ज्यांचे विजयी उमेदवार किंग मेकर ठरतील. मात्र, यातील बहुतांश उमेदवार अपक्ष (बंडखोर) आहेत किंवा छोट्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत.  (Marathi Tajya Batmya)

भारतीय आदिवासी पक्षाचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेस-भाजपचे बंडखोर असलेले 9 अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. बसपाचे उमेदवार २ जागांवर तर सीपीआयएमचे उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहेत.

या जागांवर विजयी उमेदवार ठरू शकतात किंग मेकर

अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजपचे हे बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवार भाजपच्या हाती सत्तेची चावी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. दोन्ही पक्षांच्या बंडखोर उमेदवारांमध्ये चंद्रभान सिंग अक्या (चितोडगड), बंशीधर बजिया (खंडेला), युनूस खान (दिडवाना), रवींद्र सिंग भाटी (शिव), कैलाश मेघवाल (शाहपुरा), आशा मीना (सवाई माधोपूर), राजपाल सिंग शेखावत यांचा समावेश आहे. (झोटवारा). आशु सिंग सुरपुरा (झोटवारा), रोहिताश्व शर्मा (बंसूर), प्रियंका चौधरी (बाडमेर) या नावांचा समावेश आहे. जे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. (Marathi Tajya Batmya)

या त्या जागा आहेत, जिथून भाजप-काँग्रेसची तिकीटे कापल्यानंतर हे नेते बंडखोर झाले होते, मात्र लोकांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याने ते निवडणुकीच्या निकालात विजयी होताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT