Madhya Pradesh Assembly Election Result : भोपाळ गॅस गळती दुर्घटना... जनता जनार्दन की जय... भाजप मुसंडी मारताच शिवराज सिंह काय म्हणाले?

Janata Janardhan ki Jai! What did Shivraj Singh say when BJP thrusts...
Madhya Pradesh Assembly Election Result
Madhya Pradesh Assembly Election Resultesakal

Madhya Pradesh Assembly Election Result : मध्य प्रदेशात यंदा सत्ताबदल होण्याची शक्यता अनेक एक्झिट पोलनीं वर्तवली होती. मात्र आज निकालाच्या दिवशी भाजप सध्याच्या घडीला मोठी मुसंडी मारताना दिसत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

1984 मध्ये 2 - 3 डिसेंबरलला भोपाळ गॅस गळती दुर्घटना झाली होती. त्या दुर्घटनेतील मृत व्यक्तीना श्रद्धांजली व्यक्त करत आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पर्यावरणपूरक विकासाला महत्व देणार असल्याचे सांगितले.

याचबरोबर त्यांनी भाजप बहुमताच्या जवळ जातयं असं दिसताच ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणताात की, 'भारत माता की जय, जनता जनार्दन की जय.'

Madhya Pradesh Assembly Election Result
Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE : मध्य प्रदेशात भाजपची 230 पैकी 137 जागांवर आघाडी

मध्यप्रदेशात बहूमताच्या आकड्याजवळ पोहचल्यानंतर शिवराज सिंह यांनी सांगितले की भाजप राज्यात पूर्ण बहूमत मिळवत सरकार राखणार आहे.

ते म्हणाले, 'मला विश्वास आहे की लोकांच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पूर्ण बहूमताचं सरकार स्थापन करणार आहे.'

निवडणुकांच्या सुरूवातीच्या कलानुसार मध्य प्रदेशात भाजप 230 पैकी 124 सीट जिंकत आहे. तर काँग्रेस 100 जागांच्या आसपास अडकली आहे.

Madhya Pradesh Assembly Election Result
Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: सचिन पायलट आघाडीवर; भाजप 124 वर आणि काँग्रेस 61 वर

मध्य प्रदेशात यंदा काँग्रेस, भाजपला जोरदार टक्कर देईल असं एक्झिट पोल सांगत होते. मात्र निकाल हाती येऊ लागल्यानंतर मध्य प्रदेशच्या जनतेने यावेळी देखील भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली असल्याचे दिसत आहे. भाजपने पहिल्या फटक्यातच बहुमताचा आकडा पार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com