CM Eknath shinde Rakesh Jhunjhunwala Sakal
देश

मार्गदर्शक हरपला; झुनझुनवाला यांच्या निधनावर CM शिंदेंनी व्यक्त केला शोक

सर्वसामान्यांना देखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं असं शिंदे म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीची आवड निर्माण करणाऱ्या, शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

शेअर बाजार हा केवळ मोजक्या श्रीमंत लोकांसाठी नसून सर्वसामान्यांना देखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं. स्वतः त्यांनी सुद्धा अतिशय कमी पैशाची गुंतवणूक करून आपली या क्षेत्रातली सुरुवात केली होती, आणि गुंतवणुकीचा अभ्यास करून एक उंची गाठली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे केवळ सट्टा बाजारातली गुंतवणूक नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे मोठे योगदान असते , त्यादृष्टीने झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना दिशा दाखविली. राकेश झुनझुनवालांनी सुचवलेल्या शेअर्सकडे आणि त्यांच्या सल्ल्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष ठेवून असायचे.विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी त्यांनी अकासा एअर ही विमान सेवाही सुरुवात केली होती. त्यांच्या निधनाने निश्चितपणे गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT