sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Jhunjhunwala: भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला कोण?

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील प्राप्तिकर खात्यात अधिकारी होते. किशोर वयातच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडं त्यांचा ओढा वाढला होता. दिवसभराच्या बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, याकडं लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांचे वडील त्यांना द्यायचे, असं बोललं जातं. झुनझुनवाला यांचा शेयर बाजाराविषयीचा ओढा अधिकच वाढत गेला. सिडनहॅम कॉलेजमध्ये शिकत असतानाच, झुनझुनवाला यांनी 1985 पासून शेअर बाजारात पैसा गुंतवण्यास सुरुवात केली होती.

चार्टर्ड अकाउंटंसीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वडिलांकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार बोलून दाखवला होता. त्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्याकडून किंवा मित्रांकडून पैसे मागयचे नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. शेअर बाजाराच्या व्यवसायात यश आलं नाही, तर त्यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही करिअर करता येऊ शकतं, असंही सांगितंल. राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली, असं सांगितलं जातं. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती आज 6 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 45,328 कोटी रुपयांची आहे.

फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची सर्वाधिक किंमत असलेली गुंतवणूक ही घड्याळं आणि दागिने तयार करणारी कंपनी टाटा समुहाच्या टायटन कंपनीमध्ये आहे. तसंच स्टार हेल्थ इन्श्युरन्स, मेट्रो ब्रँड्स आणि कॉनकॉर्ड बायोटेक सारख्या कपन्यांमध्येही झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे.

वॉरेन बफे यांना जगातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हटलं जातं. फोर्ब्सच्या माहितीनुसार, सध्या बफे यांची एकूण संपत्ती 102 अब्ज डॉलर किंवा जवळपास 7,69,903 कोटी रुपये आहे. बफे यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी शेअर खरेदी केली होती आणि 13 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा कर भरला होता, असं त्यांच्याबाबत सांगितलं जातं. त्यामुळं झुनझुनवाला यांना नेहमी भारताचे वॉरेन बफे म्हटलं जातं. मात्र झुनझुनवाला यांना ही तुलना फारशी आवडत नाही.

ही तुलना योग्य नाही. संपत्ती असो, यश असो वा परिपक्वता सर्वच बाबतीत बफे माझ्यापेक्षा खूप पुढं आहेत, असं मत झुनझुनवाला यांनी 2012 मध्ये 'रॉयटर्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. "मी कुणाचाही क्लोन नाही. मी राकेश झुनझुनवाला आहे. मी माझ्या अटींवर जीवन जगलो आहे. मला जे आवडतं, तेच मी करतो. मी जे करतो, त्याचा आनंद घेतो," असं त्यांनी त्याच मुलाखतीत म्हटलं होतं. झुनझुनवाला अनेकदा शेअर बाजाराशी संबंधित वादांमध्येही अडकले आहे.

1987 मध्ये राकेश राधेश्याम झुनझुनवाला यांनी अंधेरीच्या रेखा झुनझुनवालासोबत लग्न केले. रेखा झुनझुनवाला या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म Rare Enterprises ची स्थापना केली. त्यांच्या आणि पत्नी रेखा यांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांवर त्यांनी ही कंपनी ठेवली आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नजर टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्ससह ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीच्या शेवटी ३७ समभाग आहेत.