supreme court  esakal
देश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाला 22 जानेवारी सुट्टी नाही! ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुट्टीची बार असोसिएशनची विनंती केली अमान्य

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी केंद्र सरकारनं अनेक राज्यातील सरकारांनी राज्यात हाफडे घोषित केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टातील बार असोसिएशनकडूनही कोर्टाला पत्र लिहित सुट्टी जाहीर करण्याची विनंती करण्यात आली होती.

पण ही विनंती अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळं सोमवारी २२ जानेवारी रोजी पूर्ण वेळ सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु राहणार आहे. (ramlalla pran pratishtha supreme court does not have holiday on January 22 hearing will be held on petition of shivsena thackeray group)

सुप्रीम कोर्टानं सोमवारी २२ जानेवारीला कामकाज पूर्णवेळ सुरु राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या गटाकडून अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. कोर्ट क्रमांक १ मध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

ठाकरे गटाची याचिका काय?

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. या निकालामुळं एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या १५ आमदारांना दिलासा देण्यात आला. कारण त्यांचा एकही आमदार घटनेतील १० व्या सुचीनुसार अपात्र ठरले नाहीत. तसेच ठाकरे गटाचेही आमदार अपात्र ठरले नाहीत.

पण या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला असून पक्षात फूट पडली आहे तर कोणीतरी अपात्र व्हायलाच पाहिजेत पण ते न झाल्यानं हा निकाल चुकीचा असल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटानं नार्वेकरांच्या निकालाविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: गोरेगाव स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांचा वाढता दादागिरीचा कहर

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT