Ramlalla Pran Pratishtha: "...तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही"; 'स्मितालय'च्या विद्यार्थीनींना नकोय 22 जानेवारीला सुट्टी

प्रख्यात नृत्यांगणा झेलम परांजपे यांच्या स्मितालयातील सावित्रीच्या लेकींचा निर्णय
Smitalaya School_Jhelum Paranjape
Smitalaya School_Jhelum Paranjape

पुणे : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी राज्य सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. पण 'स्मितालय' या शाळेतील मुलींनी ही सुट्टी नाकारली आहे.

तसेच आमचा जर अभ्यास बुडाला तर खुद्द रामलल्ला देखील खूश होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. स्मितालयच्या संचालक आणि प्रख्यात नृत्यांगणा झेलम परांजपे यांनी यासंदर्भात फेसबूक पोस्ट केली आहे. (ramlalla pran pratishtha maharashtra has holiday but jhelum paranjape school smitalaya girl students denied it)

Smitalaya School_Jhelum Paranjape
One Nation One Election : 'एकत्रित निवडणूक राज्यघटनेविरोधात', काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे उच्चस्तरीय समितीला पत्र

झेलम परांजपे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

परांजपे यांनी स्मितालय या आपल्या शाळेतील विद्यार्थींनींच्यावतीनं जी पोस्ट केली आहे, त्यात म्हटलं की, "आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं.....सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. रामलल्ला सुद्धा यामुळं खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर.... आमच्या अध्यक्षा झेलमताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार...."

पंतप्रधानांचं दिवाळी साजरी करण्याचं आवाहन

दरम्यान, राम मंदिराचं उद्घाटनं आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा सोहळ्याचा देशभरात उत्सव व्हावा अशी व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारच्या मदतीनं राम जन्मभूमी ट्रस्टनं केली आहे. त्यासाठी अयोध्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी देशवासियांना २२ जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करण्याचं तसेच रामज्योत पेटवण्याचं आवाहन केलं होतं. (Latest Marathi News)

Smitalaya School_Jhelum Paranjape
Stock Market Holiday: राम मंदिर सोहळ्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार; उद्या दिवसभर होणार ट्रेडिंग

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारनं तसेच देशातील भाजपशासित राज्यांनी हाफडे घोषित केला आहे. या काळात सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये तसेच बँकांचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी राहणार आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं देखील कालच जाहीर केलं की, राज्यात २२ जानेवारीला सुट्टी असेल. या काळात शाळा महाविद्यालयांबरोबर सरकारी आणि निमसरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com