देश

पंजाबनंतर राज्यस्थानमध्येही राजकीय भूकंप? पायलट-राहुल गांधीमध्ये चर्चा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांडकडून पंजाबमधील काँग्रेस नेतृत्व बदलण्याच्या (Punjab Cabinet Reshuffle) हालचाली सुरू होत्या. त्याचवेळी राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट (congress leader sachin pilot) यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Congress ledaer Rahul Gandhi) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये खूप वेळ चर्चा झाली. अशोक गहलोत सरकारमध्ये (Rajasthan cabinet reshuffle) देखील फेरबदल होणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आता राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्यामध्ये याच मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आता राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी राजस्थानचे प्रभारी अजन मेकन यांनी अनेकदा राजस्थानवारी करून सर्व आमदारांची मत जाणून घेतली. मंत्रिमंडळात फेरबदल आणि काही निष्ठावान आमदारांचा समावेश, याशिवाय राज्यातील विविध मंडळे आणि महामंडळांमध्ये राजकीय नेमणुका याबाबत अनकेदा पायलट यांनी हायकमांडला मागणी केली. परंतु, माकन यांनी अनेक भेटी देऊनही फेरबदल झाले नाहीत. आता मात्र, राजस्थान मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल केले जातील, असे आश्वासन हायकमांडने दिले असल्याची माहिती आहे. काँग्रेस हायकमांडने निर्यणावर ठाम राहून पंजाबमध्ये नेतृत्व बदल केले. त्यामुळे आता राजस्थानमध्ये देखील आपल्याला नेतृत्व मिळेल, अशी आशा सचिन पायलट यांना आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमधील परिस्थिती ही पंजाबपेक्षा वेगळी आहे. कारण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. त्या आमदारांवर यांचे वर्चस्व आहे. मात्र, नेतृत्वबदलासाठी आता हायकमांड त्यांच्यावर दबाव आणेल, अशी आशा त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना आहे, असे अनेकदा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र, गेहलोत यांनी आतापर्यंत मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास नकार दिला आहे.

छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनीही घेतली हायकमांडची भेट -

छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. ए. सिंह देव यांनी दिल्लीवारी करत हायकमांडची भेट घेतली. छत्तीसगडमधील नेतृत्व बदलावे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविल्याचे समजते. मात्र, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT