sanjay singh Sakal
देश

Delhi Liquor Policy Case: संजय सिंह यांनी ईडी अधिकाऱ्यांनाच पाठवली मानहानीची नोटीस, 48 तासांत...

संजय सिंह यांनी ही नोटीस ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना पाठवली आहे.

राहुल शेळके

Delhi Liquor Policy Case: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

संजय सिंह यांनी ही नोटीस ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि अबकारी घोटाळा प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी जोगेंद्र यांना अबकारी धोरणाच्या आरोपपत्रात त्यांच्या नावाचा समावेश केल्याबद्दल पाठवली आहे.

संजय सिंह यांनी अधिकाऱ्यांना 48 तासांत माफी मागण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईची तयारी ठेवण्यासही सांगितले आहे.

नोटीसमध्ये संजय सिंह यांनी म्हटले आहे की, दिल्ली अबकारी प्रकरणात माझे नाव आरोपपत्रात टाकण्यात आले, तर एकाही साक्षीदाराने माझे नाव घेतलेले नाही.

माझी बदनामी करण्याच्या षड्यंत्राखाली हे करण्यात आले आहे, असे आप खासदार म्हणाले. माझ्याविरुद्ध कोणतेही साक्षीदार आणि पुरावे नाहीत, तरीही उत्पादन शुल्क प्रकरणात माझे नाव टाकण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याचा इशारा:

आप नेते संजय सिंह यांनी गुरुवारी सांगितले होते की ते दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपपत्रात नावाचा समावेश केल्याबद्दल ईडी अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल करणार आहेत.

या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले होते की, ईडी आप नेत्यांना अडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपचे नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर दबाव आणून खोटी वक्तव्य केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : विद्यार्थ्यांना मुख्य संदेश हाच द्यायचा आहे की, आम्ही तुमच्या सोबत आहोत - राहुल गांधी

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT