"मला ED, CBI द्या २ तासात मोदी-अदानींना अटक करतो" ; आप खासदाराचा दावा - AAP MP Sanjay Singh has claimed to arrest Modi and Adani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gautam adani and narendra modi

"मला ED, CBI द्या २ तासात मोदी-अदानींना अटक करतो" ; आप खासदाराचा दावा

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर भाजप आणि आप मधील संघर्ष वाढला आहे. आप नेत्यांनी रविवारी दावा केला की सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने करत असताना त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी त्यांना अटक करण्यात आली. मात्र दिल्ली पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर आप खासदार संजय सिंह मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

अशा परिस्थितीत कोठडीतून सुटल्यानंतर आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, "मनीष सिसोदिया यांना अटक करणे हा मोदी सरकारचा भ्याडपणाचा परिचय आहे. मला सीबीआय द्या, २ तासात मोदी आणि अदानींना अटक करतो"

"मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि ईडी आणि सीबीआय आपल्यासोबत असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांना दोन तासांत अटक करू, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे. 

टॅग्स :Narendra Modigautam adani