SC youth thrashed with sticks in Sonepat, video goes viral
SC youth thrashed with sticks in Sonepat, video goes viral 
देश

अर्धनग्न करून मारले अन् नाचायलाही लावले (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

सोनीपत (हरियाणा): गन्नोर येथे एका युवकाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. विव्हळत असलेल्या युवकाला अर्धनग्न अवस्थेत गाण्यावर नृत्यही करायला लावले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल झाला आहे.

एक महिना पूर्वीची घटना असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फरार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडित युवकाच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारी मध्ये म्हटले आहे की, 'माझा 17 वर्षांचा मुलगा एका फॅक्टरीमध्ये काम करत आहे. गावातील जितेंद्र व मोहित यांनी मुलाला शेतामध्ये काम करण्याबरोबच जणावरांची देखभाल करण्यास सांगितले होते. परंतु, त्याने फॅक्टरीमध्ये काम करत असल्याचे सांगत शेतामध्ये काम करण्यास नकार दिला. यानंतर जितेंद्र व मोहितने युवकाला जबरदस्तीने पकडून शेतात नेले. शेतामधील एका खोलीमध्ये अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. यावेळी जिवाच्या आकांताने ओरडत होता. अर्धनग्न अवस्थेतच त्याला नृत्यही करायला लावले. तब्बल चार तास हा प्रकार सुरू होता. मारहाण व नृत्य करतानाचे वेगवेगळे व्हिडिओही त्यांनी तयार केले होते.'

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फरार झालेले जितेंद्र व मोहित यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT