देश

"डिजी ठाणे' प्रकल्पास "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्कार 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

दिल्ली येथे कॉस्टिट्यूशन क्‍लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

इस्राईलची राजधानी तेल अविवमध्ये हा प्रकल्प पाहिल्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले. त्यांच्या या पुढाकारातून साकारलेल्या "डिजी ठाणे' उपक्रमासाठी आता अन्य महापालिकाही पुढे येत आहेत. 

स्कॉच ग्रुपने दिल्ली येथे शिखर परिषदेचे आयोजन केले होते. स्कॉच स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्यांनी सहभाग घेतला होता. "स्कॉच' या संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण, स्मार्ट सिटी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो. "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराची निवड प्रक्रिया अतिशय काटेकोर असून, प्रस्तुत प्रकल्पांचे मूल्यांकन सादरीकरणाच्या आधारे ज्युरीकडून केले जाते. या शिखर परिषदेत प्रात्यक्षिक, प्रदर्शन, प्रतिनिधी आणि तज्ज्ञांमधील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

"डिजी ठाणे' या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. डिजिटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत "डिजी ठाणे' या डिजिटल प्रणालीला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिजी प्रकल्प उभारणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. 

"डिजी ठाणे' प्रकल्पाला ठाण्यातील लाखो नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधला जात आहे. "डिजी ठाणे' उपक्रमाची दखल घेऊन केंद्रीय नगर विकास विभागाने हा प्रकल्प देशात इतरत्र सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारासणी या मतदारसंघात सोळा सप्टेंबर रोजी या विषयावर खास बैठक होणार आहे. या शहरातही डिजीचा उपक्रम सुरू केला जाणार आहे. 

"डिजी ठाणे' या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेले आहे. ही ठाणे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आजच्या घडीला एक लाख सत्तर हजार नागरिक "डिजी ठाणे'बरोबर जोडले गेले आहेत. ठाणे शहरातील हा आगळावेगळा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला असल्याने ठाण्यातील नागरिकांची मान अधिक उंचावली आहे. शहरातील नागरिक डिजीचा जास्तीत जास्त वापर करीत असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे. भविष्यात या नागरिकांमध्ये अधिक वाढ होणार असल्याचा मला विश्वास आहे. 
- संजीव जयस्वाल, महापालिका आयुक्त, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT