देश

शिवसेनेला दुसरा मोठा धक्का; आमदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

सकाळन्यूजनेटवर्क

लोकसभा 2019 ः चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते. डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा दुसरा मोठा धक्का मानण्यात येत आहे. 

धानोरकर यांना येत्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता असल्याची चर्चा आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून धानोरकर शिवबंधन तोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. कॉंग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांना कॉंग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना आता यश आल्याचे बोलले जात आहे.

आमदार धानोरकर हे पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते वरोरा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. गेल्या काही महिन्यांपासून मात्र ते सेना नेतृत्वावर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युतीच्या विरोधात सुद्धा त्यांनी वक्तव्य दिले होते. 

चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहीर यांचे विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडेही कोणताही मजबूत उमेदवार नव्हता. चंद्रपूर जिल्ह्यातील जातीय समीकरणातही धानोरकर यांचे पारडे जड आहे. या संदर्भात आमदार धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता या विषयावर मी आताच काही बोलणार नाही. मी एका कार्यक्रमात असल्याचे आमदार धानोरकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. परंतु आमदार धानोरकर यांच्याजवळच्या सूत्रांनी मात्र कॉंग्रेस प्रवेश पक्का असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. धानोरकर यांनी शिवसेना सोडल्यास हा सेनेसाठी मोठा धक्का ठरणार आहे. तसेच कॉंग्रेससाठी हा मोठा विजय ठरणार आहे. धानोरकर कॉंग्रेसचे उमेदवार राहिल्यास हंसराज अहीर यांचा मार्ग निश्‍चितपणे कठीण होणार असल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT