sidhi bas fall canal 
देश

MP Bus Accident - रस्ता बदलणं पडलं महागात, 42 जणांचे मृतदेह सापडले

सकाळ डिजिटल टीम

सिधी - मध्य प्रदेशातील सीधी इथं बस कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवाशी वाहून गेल्याची शक्यता आहे. तर 7 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अपघाताची माहिती घेतली असून बचावकार्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. सकाळी 7.30 च्या सुमारास हा अपघात झाला. 

अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य सुरु केलं होतं. त्यानंतर घटनास्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिकासुद्धा दाखल झाल्या होत्या. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या अपघातानंतर म्हटलं की, ही घटना अत्यंत दुख:द असून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत दिली जाईल. पीडित कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. त्यांनी व्हिडिओ शेअर करून या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, दुर्घटनेनंतर राज्य सरकारने सर्व महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय़ घेतला. यात एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या एक लाख घरांच्या लाभार्थ्यांशी अमित शहा सकाळी संवाद साधणार होते. 

दुर्घटना झालेली बस 32+2 सीटर होती. यामध्ये 38 प्रवाशी सीधी बस स्टँडवर बसले होते. प्रवाशांची संख्या जास्त असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी पाच वाजता बस निघणार होती मात्र वेळेच्या दोन तास आधीच तीन वाजता बस निघाली. नेहमीच्या रस्त्याने न जाता बस दुसऱ्याच रस्त्याने नेली. ट्राफिक जाम झाल्यानं ड्रायव्हरनं अचानक रस्ता बदलला आणि 7 किलोमीटर नवीन रस्त्याने बस नेली. यावेळीच बस कालव्यात कोसळली. तेव्हा ड्रायव्हर विश्वकर्माने पोहून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला. रेल्वेच्या परीक्षेमुळे बसमध्ये जास्त विद्यार्थी होते. 

सकाळी 7.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमधील सात प्रवासी पोहत बाहेर आले. कालवा 30 फूट खोल असल्याने पूर्ण बसच बुडाली होती. बचावकार्यात पाण्यामुळे मोठा अडथळा येत होता.  त्यामुळे बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला. आतापर्यंत 42 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT