esakal | कशी चालते 'हिंदू इकोसिस्टीम'?; भाजपच्या द्वेष पसरवणाऱ्या प्रचाराची यंत्रणा उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

kapil mishra hindu ecosystem

 'न्यूजलाँड्री'ने एका रिपोर्टमधून भाजपच्या द्वेषमूलक प्रचाराबाबतची धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून उघडकीस आणली आहे. या रिपोर्टमध्ये न्यूजलाँड्रीने भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या हिंदू इकोसिस्टीमविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

कशी चालते 'हिंदू इकोसिस्टीम'?; भाजपच्या द्वेष पसरवणाऱ्या प्रचाराची यंत्रणा उघडकीस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : 'न्यूजलाँड्री'ने एका रिपोर्टमधून भाजपच्या द्वेषमूलक प्रचाराबाबतची धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून उघडकीस आणली आहे.  Hate factory: Inside Kapil Mishra’s ‘Hindu Ecosystem’ असं या रिपोर्टचं नाव आहे. या रिपोर्टमध्ये न्यूजलाँड्रीने भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या हिंदू इकोसिस्टीमविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. 'हिंदू खतरे में है' ही भावना सातत्याने ताजी ठेवून आक्रमक, हिंसक आणि द्वेषमूलक मजकूराचा प्रसार आणि प्रचार करणे तसेच अत्यंत सुनियोजित पद्धतीने सरकारसमर्थक असा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करुन प्रोपगंडा तयार करण्याचं काम या हिंदू इकोसिस्टीमच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं हा रिपोर्ट सांगतो. न्यूजलाँड्रीच्या काही पत्रकारांनी या इकोसिस्टीममध्ये सहभागी होऊन या धक्कादायक द्वेषाच्या फॅक्टरीचा खुलासा केला आहे. 

हेही वाचा - सुनियोजित काम करणारी भाजपची 'हेट फॅक्टरी'; सोशल मीडियावरच्या 'हिंदू इकोसिस्टीम'चा पर्दाफाश

कशी चालते ही 'हिंदू इकोसिस्टीम'?

  • सुरवातीला एका गुगल फॉर्ममध्ये सामान्य माहिती भरावी लागते. त्यामध्ये तुम्ही कोणत्या विषयांत इंटरेस्टेड आहात, असाही एक प्रश्न आहे. उदा. गौरक्षा, लव्ह जिहाद, घरवापसी, मंदिर निर्माण इ. पर्याय आहेत. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केलं जातं.
  • इथे द्वेषमूलक, धर्मांध, खुनशी आणि प्रोपगंडा करणारं साहित्य सहभागी लोकांना पुरवलं जातं.
  • कपिल मिश्रा यांनीच 27 नोव्हेंबर 2020 ला दिलेल्या माहितीनुसार, या इकोसिस्टीममध्ये 27 हजार जणांनी फॉर्म भरला. त्यातील 15 हजार जणांनी टेलिग्राम  ग्रुप जॉइन केला. तर 5 हजार जणांनी 'ट्विटर टीम' मध्ये सहभाग घेतला होता. 'योगी आदित्यनाथ' यांच्या नावाने कुणीतरी या सहभागी लोकांना ऍड केलं. 
  • ग्रेटा थनबर्ग प्रकरणात शेतकरी आंदोलनाला विरोध करण्यासाठी ज्या टूलकिटवरुन देशात सध्या चर्चा आहे, त्याचप्रकारच्या अनेक टूलकिट या ठिकाणी पुरवल्या जातात. 
  • ज्या विषयावर कॅम्पेन करायचे आहे, त्याची आधी पूर्वकल्पना कपिल मिश्रा यांच्याकडून दिली जाते. वेळ सांगितली जाते. आवश्यक ते साहित्य, टूलकिट्स, इमेजेस, लिंक्स आणि ट्विट्सचा मजकूर पुरवला जातो. 
  • उदाहरणार्थ, #AntiHinduCAAriots या विषयावर कॅम्पने करण्यासंदर्भातील पूर्वकल्पना देऊन नियोजित वेळेला करायच्या ट्विट्सचा मजकूर या लोकांना आधी पुरवला गेला. 
  • कॅम्पेन सुरु झाल्यानंतर हॅशटॅग ट्रेंड होतोय का? किती लोकांनी सहभाग घेतला आहे आणि त्याचा काय परिणाम होतोय याचीही माहिती आणि 'ऍनालिटीकल डेटा' या लोकांना देऊन अधिकाधिक जोर लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
  • शिख टेरीरीझम, इस्लाम न्यूज, इरिस्पॉन्सिबल चायना, चर्च स्पीक्स यासारख्या नावांचे तयार मजकूराच्या अनेक फाइल्स पुरवल्या जातात. 
  • बरेचदा अशा लिंक्स पुरवल्या जातात, ज्यावर क्लिक केले असता थेट ट्विटरवर ट्विट येतं जे फक्त पोस्ट करण्याचे काम करावे लागते. इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने सहभागी लोकांना साहित्य पुरवलं जातं. 
  • या इकोसिस्टीमचे इतरही सहाय्यकारी काही ग्रुप्स आहेत. प्रशासक समिती नावाच्या ग्रुपमध्ये 33 हजारहून अधिक मेंबर आहेत. अनुशीलन समिती ग्रुपमध्ये 10 हजारहून अधिक मेंबर आहेत. राम राम जी या ग्रुपमध्ये 1900 हून अधिक मेंबर आहेत. पद्धतशीर आणि शिस्तबद्ध रित्या काम करण्यासाठीची उतरंडीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. 

न्यूजलाँड्रीच्या या रिपोर्टच्या मते, या हिंदू इकोसिस्टीमद्वारे भाजप सरकारविरोधातील प्रत्येक आवाज मोडून काढला जातो. तसेच खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या बातम्या-माहिती पसरवली जाते. मुस्लिम, काँग्रेस, ख्रिश्चन, पाकिस्तान आणि सत्ताविरोधी प्रत्येक घटकाला लक्ष्य करुन पद्धतशीरपणे विरोध करण्याचं काम केलं जातं. अत्यंत सुनियोजित पद्धतीने सरकारसमर्थक असा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करुन प्रोपगंडा तयार केला जातो. 'हिंदू खतरे में है' ही भावना सातत्याने ताजी ठेवून आक्रमक, हिंसक आणि द्वेषमूलक मजकूराचा प्रसार आणि प्रचार या यंत्रणेमार्फत केला जातो. 

हेही वाचा - उत्तराखंडमध्ये RSS ची मदत; फोटो शेअर केल्यानं परेश रावल ट्रोल

कोण आहेत कपिल मिश्रा?
कपिल मिश्रा हे आधी आम आदमी पक्षाकडून आमदार राहिले आहेत. ते आता भाजपचे नेते आहेत. 23 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर दिल्लीच्या भागात उसळलेल्या दंगलीसाठी कपिल मिश्रा यांनी केलेलं चिथावणीखोर भाषण कारणीभूत ठरलं, असा त्यांच्यावर आरोप होता. मात्र, दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी त्यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.