Ram_Temple 
देश

अयोध्या : राम मंदिर बांधकामाच्या उत्खननात सापडल्या पादुका

वृत्तसंस्था

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येत सध्या राम मंदिराच्या (Ram Temple Ayodhya) बांधकामाचे कामकाज सुरू आहे. यासाठी परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. मंदिर परिसरात उत्खननाचे काम सुरू असताना ट्रस्टला अनेक आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या आहेत. यामध्ये चरण पादुका आणि काही मूर्त्यांचा समावेश आहे. हे सर्व अवशेष आणि वस्तू ट्रस्टने सुरक्षित ठेवल्या आहेत.   

सध्या मंदिराचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे. भव्य राम मंदिर उभारण्यासाठी सुमारे ४० फूट खोल पाया खोदला जात आहे. उत्खननावेळी एक चरण पादुका आणि काही खंडीत स्वरुपातील मूर्त्या आढळून आल्या आहेत. या मूर्त्या नक्की कुणाच्या आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. उत्खननात आतापर्यंत मिळालेली प्रत्येक गोष्ट ट्रस्टने जतन करून ठेवल्या आहेत. या सर्व अवशेषांचा तपास पुरातत्व विभागातर्फे करण्यात येणार आहे. 

सीता रसोईत मिळाल्या अनेक गोष्टी 
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या एका प्रशासकाने सांगितले की, आतापर्यंत बांधकामाच्या उत्खननात अनेक महत्त्वाचे अवशेष सापडले आहेत. २० फूट खोदल्यानंतर वेगवेगळ्या वस्तू सापडण्यास सुरवात झाली. सीता रसोईच्या उत्खननात पाटा-वरवंटा आणि बेलनं सापडलं आहे. मानस भवनच्या उत्खननावेळी चरण पादुका सापडली आहे. 

या सर्व वस्तू कोणत्या काळातील आहेत, या बद्दल अद्याप काही सांगता येत नाही. उत्खननात सापडलेल्या वस्तूंची तपासणी पुरातत्व विभागाकडून केली जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एल अँण्ड टीसह टीईसीच्या तज्ज्ञांनी अल्ट्रा टेक सिमेंटच्या वापरावर शिक्कामोर्तब केलं आहे. या सिमेंटचा पुरवठा थेट कंपनीकडून केला जाणार आहे. उंचाहार येथून दोन ट्रक फ्लाय अॅश चाचणीसाठी मागविण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेशच्या छत्तरपूर आणि उत्तर प्रदेशच्या कबरी बांदा येथून बीएसआय मार्क असलेले बॅलॅस्ट (गिट्टी) आणि स्टोन डस्ट मागविण्यात आले आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT