देश

Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांच्या चेहऱ्यावर मुक्कामार; मुख्यमंत्र्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?

गरुवारी रात्री तब्बल तीन तास मालीवाल यांची मेडिकल टेस्ट झाली. शुक्रवारी त्यांचे मेडिकल रिपोर्ट येणार आहेत. एमएलसीमध्ये मालीवाल यांच्या चेहऱ्यावर मुक्कामार लागल्याचं समोर आलेलं आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर ८ सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहत. या सगळ्यांचा तपास होणार आहे.

संतोष कानडे

Arvind Kejriwal AAP News : राज्यसभा खासदार आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली आहे. त्यांनी गुरुवारी अडीच पानांची तक्रार दाखल केली आहे. त्या दिवशी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती स्वाती यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी केल्यानंतर त्यांचा जबाब घेतला आहे. त्यानंतरच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. आता पोलिस केजरीवाल यांच्या घरामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ज्या कंपनीने सीसीटीव्ही फुटेज लावले आहेत, त्या कंपनीकडून पोलिस फुटेज घेणार आहेत. या घटनाक्रमाशी जोडलेले अनेक फुटेज तपासण्याचं काम पोलिस करणार आहेत.

त्यापूर्वी गरुवारी रात्री तब्बल तीन तास मालीवाल यांची मेडिकल टेस्ट झाली. शुक्रवारी त्यांचे मेडिकल रिपोर्ट येणार आहेत. एमएलसीमध्ये मालीवाल यांच्या चेहऱ्यावर मुक्कामार लागल्याचं समोर आलेलं आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर ८ सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहत. या सगळ्यांचा तपास होणार आहे.

ज्या दिवशी मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, त्या दिवशी १३ मे रोजी स्वाती मालीवाल किती वाजता सीएच्या निवासस्थानी पोहोचल्या. तिथे त्यांना कोण कोण भेटलं, त्या सगळ्यांचे जबाब घेतले जाणार आहेत. त्या टॅक्सीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं सांगितलं जातंय. त्या टॅक्सी ड्रायव्हरचाही जबाब पोलिस घेणार आहेत.

दरम्यान, स्वाती मालीवाल यांच्या माहितीच्या आधारे, दिल्ली पोलिसांनी आरोपी बिभव कुमार विरुद्ध कलम 354 , कलम 506, कलम 509, कलम 323 आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी स्वाती मालीवाल यांना रात्री उशिरा वैद्यकीय उपचारासाठी एम्समध्ये नेण्यात आले.

स्वाती मालीवाल यांची पोस्ट

स्वाती मालीवाल यांनी संध्याकाळी उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केली. ''माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. याप्रकरणी मी माझी तक्रार पोलिसांना दिली आहे. योग्य ती कारवाई होईल, अशी आशा आहे. गेलेले दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानते. मी हे सर्व दुसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून करतेय, असे ज्यांनी सांगितले, त्यांनाही देव सुखी ठेवो.'' अशी पोस्ट त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT