India vs England 2nd Test Day 4 Live Updates in Marathi Cricket News : लोकेश राहुलच्या विकेटनंतर सातव्या आकाशात असलेल्या इंग्लंडला रिषभ पंतने दिवसा तारे दाखवले. पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमकता दाखवली आणि इंग्लंडच्या सर्व रणनीतीला सुरूंग लावला. त्याने पायावर बसून डाव्या बाजूला मारलेल्या खणखणीत षटकार नवा विक्रम रचणारा ठरला. रिषभ एवढ्या जोरात बॅट फिरवत होता की त्याच्या हातून बॅट सटकली. हे पाहून जसप्रीत बुमराहही हसू लागला. त्याला दोन जीवदानही मिळाले.