Demonetisation  Esakal
देश

Demonetisation : नोटबंदीला राजकीय विरोध होण्याची पहिली वेळ नाही, यापूर्वी गुजराती पंतप्रधानांनी झेलली होती टीका

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 1978 मध्ये नोटाबंदी केली होती

सकाळ डिजिटल टीम

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 1978 मध्ये नोटाबंदी केली होती. मुंबईतील आरबीआय इमारतीसमोर नोटा बदलण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांचे फोटो टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाले आहे. 1980 च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये नोटाबंदीला मोठा मुद्दा बनवून इंदिरा गांधींनी एक नारा दिला - "जे सरकार चालवू शकतात त्यांना निवडा." या निवडणुकीत काँग्रेसला 520 पैकी 353 जागा मिळाल्या. त्यानंतर आता 39 वर्षांनंतर पुन्हा नोटबंदीचा मुद्दा समोर आला आहे.

नोटाबंदी कधी झाली?

मोरारजींनी 1000, 5,000 आणि 10,000 च्या नोटा 16 जानेवारी 1978 रोजी बंद केल्या होत्या. जे एकूण चलनाच्या 20% होत्या. तेव्हा 95% लोकांनी या नोटा पाहिल्याही नव्हत्या. मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1,000 च्या नोटांवर बंदी घातली.

गुजराती पंतप्रधान अन् पटेल गव्हर्नर

दोन्ही वेळा पंतप्रधान गुजराती होते. RBI चे दोन्ही गव्हर्नर देखील पटेल होते. 1978 मध्ये आयजी पटेल, 2016 मध्ये उर्जित पटेल.

मोदी सरकारने केलेल्या नोटबंदी विरोधात सुप्रीम कोर्टात 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सुनावणी सुरू आहे. तर नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही. असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT