Obese Person sakal
देश

Obese Person : जगातील एकूण लठ्ठ व्यक्तींची संख्या एक अब्जांवर, भारताची स्थिती काय?

जगातील एकूण लठ्ठ व्यक्तींची संख्या एक अब्जांवर गेल्याचे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. त्यात मुलांसह, किशोरवयीन व प्रौढांचा समावेश आहे.

पीटीआय

नवी दिल्ली - जगातील एकूण लठ्ठ व्यक्तींची संख्या एक अब्जांवर गेल्याचे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. त्यात मुलांसह, किशोरवयीन व प्रौढांचा समावेश आहे. जगभरात मुले व प्रौढांमध्ये १९९०च्या तुलनेत २०२२ मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चौपट झाल्याचेही वैज्ञानिकांचे जागतिक नेटवर्क असलेल्या एनसीडी- जोखमीचे घटक सहयोग व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे लठ्ठपणावर केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जगात १९९० पासून कमी वजन असलेल्या लोकांचे प्रमाण घटत असून अनेक देशांत कुपोषणाचा सर्वाधिक सामान्य प्रकार म्हणून लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणा तसेच कमी वजन हे कुपोषणाचेच प्रकार असून ते लोकांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहेत, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. लॅन्सेटच्या या ताज्या अहवालात कुपोषणाच्या या दोन्ही प्रकारांबद्दलचा ३३ वर्षांतील कल सविस्तर दिला आहे.

१९९० ते २०२२ दरम्यान जगातील मुले व किशोरवयीनांमधील कमी वजन असणाऱ्यांचे प्रमाण मुलींमध्ये एकपंचमांश तर मुलांमध्ये एक तृतीयांशने कमी झाले. मुलींमधील लठ्ठपणाचा दर १९९० मधील ०.१ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ३.१ टक्क्यांवर तर मुलांमध्ये ०.१ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर गेला आहे.

जगातील लठ्ठ व्यक्ती

मुले : १६ कोटी

प्रौढ : ८८ कोटी

जगभरात १९९० च्या दशकात प्रौढांमध्ये लठ्ठपणा आढळत होता. मात्र, आता शालेय विद्यार्थी तसेच किशोरवयीनही लठ्ठ होत आहेत. दुसरीकडे, विशेषत: जगातील सर्वाधिक गरीब देशांत आजही लक्षावधी जणांचे उपासमारीमुळे कुपोषण होत आहे. कुपोषणाच्या दोन्ही प्रकारांचा सामना करण्यासाठी पौष्टिक आहाराची उपलब्धता लक्षणीयरित्या वाढविण्याची गरज आहे.

- प्रा. माजिद इझ्झाटी, संशोधक, ब्रिटन

भारतातील मुलेही स्थूल

एकूण लठ्ठ मुले - एक कोटी २५ लाख

मुलांची संख्या - ७३ लाख

मुलींची संख्या - ५२ लाख

भारतातील लठ्ठपणा

पुरुषांमधील प्रमाण

१९९० : ०.५ टक्के

२०२२ : ५.४ टक्के

एकूण लठ्ठ पुरुष : दोन कोटी साठ लाख

महिलांचे प्रमाण

१९९० : १.२ टक्के

२०२२ : ९.८ टक्के

एकूण लठ्ठ महिला : चार कोटी चाळीस लाख

जगभरातील लठ्ठ व्यक्ती

१ अब्ज

बीएमआय ३० पेक्षा अधिक असणाऱ्या

भारताचे स्थान (१९८ देशांपैकी)

१८२ : महिलांमधील लठ्ठपणात

१८० : पुरुषांमधील लठ्ठपणात

स्रोत : लॅन्सेट

कसे केले संशोधन?

संशोधकांनी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या जगातील २२ कोटी लोकांच्या वजन व उंचीचे (बीएमआय) विश्लेषण केले. यात १९० पेक्षा अधिक देशांतील पाच ते एकोणीस वयोगटातील सहा कोटी ३० लाख व २० पेक्षा अधिक वयोगटातील १५.८ कोटी जणांचा समावेश होता. यात सुमारे दीड हजार संशोधक सहभागी झाले होते. त्यावरून १९९० पासून २०२२ पर्यंत लठ्ठपणातील बदल नोंदविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla 18 Days in Space: शुभांशु शुक्लांनी अंतराळात १८ दिवस कसे घालवले, नेमकं काय-काय केलं अन् सोबत काय आणलं?

ICC World Cup 2025: आठ संघांच्या सराव सामन्याचे वेळापत्रक घोषित; यजमान टीम इंडिया 'या' दोन संघाविरुद्ध खेळणार

Epfo Rule: आता भाडे नाही, तर ईएमआय भरा! घर खरेदी करण्यासाठी पीएफ आर्थिक आधार देणार, ९० टक्के रक्कम मिळणार

क्रिती सेनॉन-जावेद जाफरीच्या इमारतीत घुसला अज्ञात व्यक्ती, बॅगेतली ती वस्तू लिफ्टमध्ये ठेवली आणि... 'त्या' कृत्यानं सोसायटीत खळबळ

Mumbai News: विद्यार्थ्यांची बससेवा बंद! मनपाच्या थकबाकीमुळे शिक्षणावर गदा, शिवसेनेचा इशारा

SCROLL FOR NEXT