
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील संधू पॅलेस या प्रसिद्ध इमारतीत एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याची घटना घडलीये. या इमारतीत कृती सेनॉन आणि जावेद जाफरी यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री राहतात. या व्यक्तीने इमारतीमध्ये जाऊन काय केलं हे वाचल्यावर अनेकांच्या भुवया उंचवल्यात. या घटनेसंदर्भात, मुंबईतील खार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम ३२४ (२) आणि ३२४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.