
थोडक्यात:
ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ भारत व श्रीलंकेत ३० सप्टेंबरपासून होणार आहे.
स्पर्धेपूर्वी ९ सराव सामने २५-२८ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
भारत अ आणि श्रीलंका अ यासारखे संघही सराव सामन्यांत सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मंगळवारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका या दोन देशात महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धात यावर्षी ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल.
भारतातील बंगळुरू, इंदूर, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी या चार ठिकाणी, तर श्रीलंकेतील कोलंबो या एका ठिकाणी या स्पर्धेतील सामने होतील. दरम्यान, आयसीसीने मंगळवारी या स्पर्धेसाठी होणाऱ्या सराव सामन्यांचीही घोषणा केली आहे.