tractor rally farmers protest reached at red fort delhi 
देश

Tractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आजच्या 62व्या दिवशी थोडे हिंसक वळण लागले. इतक्या दिवसांच्या आंदोलनानंतरही त्यावर तोडगा निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांची नियोजित  'किसान गणतंत्र परेड'  अर्थात ट्रॅक्टर परेड मार्ग बदलून दिल्ली शहरात घुसली. पोलिसांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकऱ्यांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले.

आणखी वाचा - ट्रॅक्टर परेट, आंदोलकांकडून पोलिसावर हल्ला

शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध करण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्यात पंजाब, हरियाणा, दिल्ली परिसरातील लाखो शेतकरी सहभागी झाले. या रॅलीसाठी गेल्या दोन दिवसांपासून ट्रॅक्टर दिल्लीच्या सीमेवर आणण्यात आले होते. हजारो शेतकरी सिंघु, टीकरी आणि गाजीपूर बॉर्डरवर जमले होते. तिरंग्यासह सहभागी झालेले शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे लक्षवेधी ठरत होते. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण, शेतकऱ्यांची रॅली ऐनवेळेला मार्ग बदलून दिल्लीत घुसली. या रॅलेने पोलिसांचे सर्व मार्ग अडथळे पार करत थेट लाल किल्ला गाठला.

शेतकऱ्यांची संख्या आणि ट्रॅक्टरची संख्या जास्त असल्याने थोडा गोंधळ झाला आहे. कोणी कोठे जायचे हे निश्चित न झाल्यानं अशी परिस्थिती झाली आहे. शेतकरी पुन्हा मागे फिरतील आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील.
- राकेश टिकैत, शेतकरी आंदोलन नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT