देश

तोंडी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर तोंडी तलाक विधेयक आज (गुरूवार) मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. या विधेयकाच्या बाजूने 303 मते पडली असून, विधेयकाच्या विरोधात 82 मते पडली.

तोंडी तलाक विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर 24 जुलैपर्यंत तोंडी तलाकची 345 प्रकरणे समोर आल्याचे सांगितले. तसेच जेव्हा हे विधेयक मांडण्यात आले. तेव्हा या विधेयकाला विरोध दर्शवत संयुक्त जनता दल, टीएसआर, वायएसआर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. 

दरम्यान, केंद्र सरकारकडून डिसेंबर 2017 मध्ये मांडले गेलेले ‘तोंडी तलाक विधेयक’ राज्यसभेत मात्र रखडले होते. त्यामुळे सप्टेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारने याबाबतचा नवीन अध्यादेश काढला होता. मात्र, आता हे विधेयक लोकसभेत आज मंजूर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT