BJP
BJP 
देश

निवडणूकी आधीच भाजपचे दोन उमेदवार विजयी

सकाळवृत्तसेवा

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत निवडणूकीपुर्वीच भाजपचे दोन उमेदवार निवडूण आले आहेत. राज्यातील आलो ईस्ट आणि यचुली या दोन विधानसभा मतदारसंघातून सर केंटो जिनी आणि ताबा तेडीर यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली. याविषयी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण जिजिजू यांनी ट्विट करुन माहिती पोस्ट केली आहे.  
देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापत चालले असताना, देशातील आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या तीन लोकसभे सोबतच विधानसभेचीही रणधूमाळी सुरु आहे. 11 एप्रिल या दिवशी या राज्यांमध्ये विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत. अरुणाचल मध्ये भाजपचे सरकार असून पेमा खांडू हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 

 
केंटो जिनी या भाजपाच्या उमेदवराने 31 आलो ईस्ट या विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. विधानसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 मार्च होती. पंरतु, त्यांच्या विरोधात एकानेही उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषीत करण्यात आले. त्याचप्रमाणे 16 यचुली मतदारसंघातील उमेदवार ताबा तेडीर यांच्या विरोधातही कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांनाही बिनविरोध विजय मिळाला आहे. या विषयी केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी ट्विटकरून ही माहिती प्रसिद्ध केली.
भाजपला निवडणूका होण्याआधीच मिळालेल्या या दोन विजयांमुळे याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT