Study Sakal
देश

मागास विद्यार्थ्यांसाठी मिळणार UPSCचे मोफत प्रशिक्षण; केंद्राची योजना

समाजातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय विश्वविद्यालय पुढाकार घेणार आहेत.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : समाजातील गरीब आणि मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय विश्वविद्यालय पुढाकार घेणार आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेसाठी तयारी करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्राचे व्यवस्थापन केंद्रीय विश्वविद्यालायकडून चालवण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलेंस कडून करण्यात येणार आहे. ही योजना केंद्राच्या सामाजिक कल्याण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील मागास आणि गरीब विद्यार्थ्यांना युपीएससीचा मोफत अभ्यास करता येणार आहे.

(UPSC Free Training For Backward Class And Poor Student)

दरम्यान या प्रशिक्षण केंद्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक देण्यात येणार आहेत. देशभरातील तब्बल ३० विश्वविद्यालयात ही सेवा सुरू केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. केंद्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सामावेश व्हावा यासाठी केंद्रीय सामाजिक कल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. आंबेडकर फाऊंडेशनने यासाठी सर्व तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात कमीत कमी एका विश्वविद्यालयात हे केंद्र सुरू केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.

परंतु हे केंद्र सुरू करण्यापूर्वी विश्व विद्यालयांना डॉ. आंबेडकर एक्सलेंस सेंटर सुरू करावे लागणार आहे. कारण विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर एक्सलेंस सेंटरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विश्वविद्यालयांना या केंद्रासाठी एक सहाय्यक आणि वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक द्यावे लागणार आहेत. गरज पडली तर प्रशिक्षणासाठी बाहेरील शिक्षकांची मदत घेता येऊ शकते असं मंत्रालयाने सांगितलं आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार विश्वविद्यालयांना वार्षिक ७५ लाखांचा निधी देणार आहे. यासाठी विश्वविद्यालयांना कमीत कमी १०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्के महिला उमेदवार असायला हव्यात अशी अट केंद्राने घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

SCROLL FOR NEXT