
राज्यसभेसाठी उगाच पैसे वाया घालवू नका; संजय राऊतांचा भाजपला सल्ला
मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यसभा निवडणुकांच्या उमेदवारीवरून आणि माघार घेण्यावरून भाजप आणि मविआ सरकारमध्ये मागच्या तीन ते चार दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. भाजपाने निवडणुकांत माघार घेतली नसल्याने आरोप प्रत्यारोप चालू आहेत.
दरम्यान "राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती ही प्रगल्भ असली पाहिजे. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. पण जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर आम्हीही तेवढ्याच मजबुतीने रिंगणात उतरलो आहोत पण प्रश्न सहाव्या जागेचा आहे." असं राऊत म्हणाले.
हेही वाचा: बिर्याणीसाठी वापरत होते शिळे मटण; प्रशासनाकडून रेस्टॉरंट सील
"सहाव्या जागेसाठी भाजप अन्य पक्षांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे मत नाहीत म्हणून त्यांच्याकडून आता आमदारांवर दबाव आणला जाणार आहे, त्यांना पैसा दिला जाणार, जुन्या प्रकरणात ईडी आणि केंद्राला घुसवणार असे काम करून आमदारांवर दबाव आणला जाणार आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी फायदा होणार नाही म्हणून उगाच भाजपने पैसे वाया घालवू नये, त्यापेक्षा सामाजिक कार्यात पैसे खर्च करावेत, लोकांना अशी चटक लावू नये." असा टोला त्यांनी भाजपला लावला आहे.
"आम्हाला अशा निवडणुकांचा सर्वाधिक अनुभव आहे, कोण कोणासोबत आहे हे दहा तारखेला कळेलंच, फक्त भाजपने उगाच पैसे खर्च करू नका." असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
Web Title: Sanjay Raut On Rajyasabha Election 2022 And Bjp Seats
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..