Vice Presidential Election Mukhtar Abbas Naqvi Arif Mohammad Khan PM Narendra Modi
Vice Presidential Election Mukhtar Abbas Naqvi Arif Mohammad Khan PM Narendra Modi  esakal
देश

उपराष्ट्रपती निवडणूक : भाजपचे मुस्लीम चेहऱ्याला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक यंदा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सहा ऑगस्ट रोजी होणार असून भाजप या पदासाठी मुस्लीम चेहऱ्याला प्राधान्य दिले जाईल, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान अशा नावांची चर्चा असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा धक्कातंत्र वापरल्यास नवे नावही पुढे येऊ शकते. कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला तर त्यांचाही विचार होऊ शकतो अशीही नवीन चर्चा आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचेही अध्यक्ष असतात. साहजिकच या पदासाठी पंतप्रधान अत्यंत काळजीपूर्वक निवड करणार हे निश्चित आहे.

विद्यमान उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचा कार्यकाल ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रद्द होणे, तोंडी तलाकबंदी कायदा, एनआरसी कायदा, नवीन शैक्षणिक धोरण अशी महत्त्वाची विधेयके राज्यसभेने मंजूर केली. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोन्ही निवडणुकांमध्ये एक मोठा फरक आहे. यासाठीचे निर्वाचक मंडळ म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज हेच वेगळे असते. उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करण्याचा अधिकार फक्त सुमारे ७९० संसद सदस्यांना असतो. प्रत्येक खासदार एक मत देऊ शकतो. सध्याच्या स्थितीनुसार राज्यसभेचे २३३, नियुक्त १२ आणि लोकसभेचे ५४३ खासदार यंदा उपराष्ट्रपतींची निवड करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT