Hyderabad CEO Death
Hyderabad CEO Death  eSakal
देश

Hyderabad CEO Death : कंपनीचा कार्यक्रम अन् स्टेजवरुन पडून झाला सीईओंचा मृत्यू! रामोजी फिल्म सिटीमध्ये झाली दुर्घटना

Sudesh

CEO Died in Ramoji Film City : हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. व्हिस्टेक्स एशिया या कंपनीचा सिल्व्हर ज्युबली सोहळा याठिकाणी सुरू होता. यावेळी स्टेजवरुन पडून कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला.

न्यूजट्रॅपने दिलेल्या माहितीनुसार, Vistax Asia कंपनीने 18 आणि 19 जानेवारी रोजी फिल्म सिटीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या मेगा सेलिब्रेशनसाठी बोलावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय देखील फिल्म सिटीमधील हॉटेलमध्ये करण्यात आली होती. ही दुर्घटना घडली तेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे 700 लोक उपस्थित होते.

"या कार्यक्रमासाठी एक विशिष्ट स्टेज बनवण्यात आलं होतं. हे स्टेज क्रेनच्या मदतीने 20 फूट उंच उचललं होतं. यासाठी 6mm जाड लोखंडी तारांचा वापर करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने यातील एक तार तुटली, आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली" अशी माहिती पोलीस निरीक्षक ए. मनमोहन यांनी तेलंगणा टुडेला दिली.

कंपनीचे प्रेसिडेंट गंभीर जखमी

ही तार तुटल्यामुळे स्टेजवर उभ्या असणाऱ्या व्यक्तींपैकी कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट दोघेही खाली कोसळले. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान संजय यांचा मृत्यू झाला. राज डाटला यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट अथॉरिटीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. संजय शाह हे या कंपनीचे फाउंडर देखील होते. त्यांनी 1999 साली ही कंपनी सुरू केली होती. याचा वार्षिक टर्नओव्हर सध्या 300 मिलियन डॉलर्स एवढं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT