Amit-Shah 
देश

दंगेखोरांवर कठोर कारवाई करू - अमित शहा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - जामिया परिसरात आंदोलकांच्या दिशेने एका माथेफिरू युवकाने गोळीबार केल्याचे प्रकरण आपण गंभीरपणे घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत व कठोर कारवाई करू, असे शहा यांनी ट्‌विटद्वारे सांगितले. 

गोळीबाराच्या घटनेनंतर जामिया परिसरात प्रचंड जमाव जमा झाला असून, ‘सीएए’ व भाजपविरोधात शांततापूर्ण निदर्शने रात्री उशिरापर्यंत सुरू आहेत. आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या पोलिसी बलप्रयोगात चार ते पाच विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती आहे. गोपाल नामक माथेफिरूने शाहीनबागेतील आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. हा तरुण ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता.

त्यामुळे दिल्लीतील निवडणुकीत धडपडणाऱ्या भाजपविरुद्ध विरोधकांच्या हाती आणखी एक हत्यार मिळाले. यामुळे भाजपचे ध्रुवीकरणाचे हत्यार बोथट होण्याची शंका येताच शहा यांनी ट्‌विट करून कडक कारवाईचा इशारा दिल्याचे मानले जाते. या प्रकरणावर अन्य भाजप नेते मौनात गेले आहेत. 

शहा यांनी ट्‌विटमध्ये म्हटले की, जामियातील घटनेबद्दल आपण दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याशी चर्चा करून त्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशी कोणतीही घटना केंद्र सरकार सहन करणार नाही. यावर गंभीरपणे कारवाई केला जाईल व दोषींना माफ केले जाणार नाही. मात्र, दिल्ली पोलिस नेमकी कोणावर कठोर कारवाई करणार, याबाबतची संदिग्धता शहांच्या ट्‌विटमध्येच दिसत असल्याची चर्चा आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना, हे दिल्लीत काय चालले आहे? दिल्लीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती आटोक्‍यात आणा, असे आवाहन केंद्राला केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT