Wheat Wheat
देश

युद्ध रशिया-युक्रेनचं अन् फायदा भारतातील शेतकऱ्यांना

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरात कच्च्या तेलाच्या व अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, युद्धाचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. युद्धामुळे जगभरात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहे. आता त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून गव्हासाठी किमान आधारभूत किंमत २,०१५ रुपये प्रति क्विंटल आहे. परंतु, बाजारात त्याची किंमत २,२५० ते २,३०० रुपये आहे. सुरुवातीच्या हंगामातच गव्हाचे भाव सरकारी दरापेक्षा जास्त असल्याचे बऱ्याच काळानंतर पाहायला मिळत आहे.

यावेळी पंजाब सरकार १० लाख टनांपेक्षा कमी गव्हाची (Wheat) खरेदी करीत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे शेतकरी गव्हाच्या पिकाचा काही भाग वाचवतील जेणेकरून भविष्यात ते खाजगी व्यापाऱ्यांना विकू शकतील, असा यामागील सरकारचा विचार आहे. खरे तर युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिकागोमधील फ्युचर्स ट्रेडिंगमध्येही गव्हाच्या किमती ४० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

रशिया आणि युक्रेन (Ukraine) हे गव्हाचे प्रमुख निर्यातदार आहेत आणि युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. अशा स्थितीत मागणी वाढली आहे आणि भारतातही त्याचा परिणाम झाल्याने किमतींनी एमएसपी ओलांडली आहे. सध्या गिरणी मालक मंडईतून गहू घेत आहेत. परंतु, नवीन साठा आल्यानंतर परदेशी खरेदीदारही मंडईत जाऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी होऊ शकते, असे कमिशन एजंटने सांगितले.

शेतकरी पिके चांगल्या भावात विकतील?

भारतात दरवर्षी गव्हाची (Wheat) किमान आधारभूत किंमत सरकारद्वारे निश्चित केली जाते. साधारणतः: खासगी व्यापारी यापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करीत आहेत. त्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, यावेळी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाने परिस्थिती बदलली आहे. शेतकरी (Farmers) आपली पिके चांगल्या भावात विकतील अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT