
मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे; नदीत फेकले
एका इसमाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार (Atrocities on the girl) केला. यामुळे चिडलेल्या वडिलांनी त्याचे तुकडे करून नदीत फेकले. ही घटना मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात घडली. त्रिलोकचंद (५५, रा. सक्तापूर, मध्य प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने बलात्कार करणारा त्रिलोकचंद याची हत्या (murder) केली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, त्रिलोकचंद याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार (Atrocities on the girl) केला होता. यामुळे मुलीचे वडील व मामा बदला घेण्याच्या उद्देशाने त्रिलोकचंद याला दुचाकीवर बसवून अजनाल नदीच्या दिशेने घेऊन गेले. यानंतर मासे कापण्याच्या साधनाने त्रिलोकचंदची हत्या (murder) करून मृतदेहाचे तुकडे केले व नदीत फेकून दिले, असे उपविभागीय अधिकारी राकेश पांड्रो यांनी सांगितले.
हेही वाचा: मोदी सरकार करणार नेहरू संग्रहालयाचे नामांतर
त्रिलोकचंद याचा मृतदेह अजनाल नदीत वाहून जात असल्याचे दिसले. जिल्हा मुख्यालयापासून नदीचे अंतर सुमारे ४० किलोमीटर आहे. सोशल मीडियावर तरंगणाऱ्या मृतदेहाचे फोटो व्हायरल होऊ लागल्यावर मृताची ओळख पटली, असे पोलिस अधिकारी विवेक सिंह यांनी सांगितले. त्रिलोकचंद याच्या हत्येप्रकरणी आरोपी वडील व मामा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इतरांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी (Police) वर्तवली आहे. मृत आणि आरोपी दोघेही नातेवाईक आहेत.
Web Title: Atrocities On The Girl Murder By Father Thrown Into The River Crime News Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..