IPS Sadanand Vasant Date NIA DG
IPS Sadanand Vasant Date NIA DG Esakal
देश

IPS Sadanand Vasant Date NIA DG: सदानंद दाते असणार NIA चे नवीन प्रमुख; 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर आले होते चर्चेत..

अंकिता खाणे (Ankita Khane)

IPS Sadanand Vasant Date NIA DG : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पोलिस सेवेतील १९९०च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या दाते यांनी महाराष्ट्र पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दाते यांची (ACC) NIA च्या महासंचालक (DG) या पदावर नियुक्तीची तारीख मंजूर केली आहे आणि त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2026 रोजी त्यांच्या सेवानिवृत्त होईपर्यंत असेल. हा आदेश 26 मार्च रोजी जारी करण्यात आला आहे. ते दिनकर गुप्ता यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत.

पीयूष आनंद हे एनडीआरएफचे नवे प्रमुख

पीयूष आनंद राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) नवे प्रमुख असतील. आनंद, उत्तर प्रदेश केडरचे 1991 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) विशेष महासंचालक आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी एनडीआरएफचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे. आनंद अतुल करवाल यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. ACC ने केरळ केडरचे 1995 बॅचचे IPS अधिकारी एस सुरेश यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) मध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

दाते 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर आले होते चर्चेत

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बेशुद्ध होईपर्यंत सदानंद वसंत दाते यांनी दहशतवादी अजमल कसाबचा सामना केला होता. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले '२६/११चा हल्ला माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक घटना आहे. हे आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी माझ्या क्षमतेनुसार त्याचा सामना केला आहे', असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र केडरचे अधिकारी दाते या एजन्सीचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील ज्यांना विशेषत: दहशतवादी प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT