Wholesale inflation Marathi News Wholesale inflation Marathi News
देश

घाऊक महागाईवर थोडा दिलासा; आकडेवारी अजूनही ३० वर्षांच्या उच्चांकावर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : किरकोळनंतर आता घाऊक महागाईही (Wholesale Inflation) थोडी कमी झाली आहे. कच्च्या आणि खाद्यतेलांसह जागतिक कमोडिटीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने भारताची घाऊक महागाई (WPI) जूनमध्ये १५.१८ टक्के पर्यंत कमी झाली. परिस्थिती सुधारली आहे. परंतु, हे आकडे अजूनही ३० वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. त्याचवेळी घाऊक महागाईचा आकडा दुहेरी आकड्यांमध्ये आल्याचा हा सलग १५वा महिना आहे. (Wholesale inflation Marathi News)

मे महिन्यातही घाऊक महागाई दर १५.८८ टक्के या तीन दशकांच्या उच्चांकावर होता. या संदर्भात जूनमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. जर आपण जून २०२१ शी तुलना केली तर घाऊक महागाई (Wholesale Inflation) दर वाढला आहे. जून २०२१ मध्ये घाऊक महागाई १२.०७ टक्के होती.

कोणाच्या किमतीत वाढ

जून २०२२ मध्ये खाद्यपदार्थांच्या (Food) किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १४.३९ टक्के वाढल्या आहेत. भाज्यांच्या किमतीत ५६.७५ टक्के वाढ झाली आहे. तर बटाटे आणि फळांमध्ये अनुक्रमे ३९.३८ टक्के आणि २०.३३ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे इंधन (Fuel) आणि विजेच्या दरात ४०.३८ टक्के वाढ झाली आहे. जूनमध्ये क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूची महागाई ७७.२९ टक्के होती.

किरकोळ चलनवाढीचा डेटा

जूनमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर किरकोळ घसरून ७.०१ टक्क्यांवर आला. तो मेमध्ये ७.०४ टक्के होता. त्याचवेळी एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा (Inflation) दर ७.७९ टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ कमी असूनही, ती सलग सहाव्या महिन्यात आरबीआयच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT