Gold Story in West Bengal
Gold Story in West Bengal 
देश

महिलेच्या पोटातून बाहेर आला दागिन्यांचा खजिना

वृत्तसंस्था

रामपूरहट (पश्‍चिम बंगाल) ः तोंडावाटे घेतलेले अन्न हे पोटात जाऊन भूक शांत होते. म्हणूनच उदरभरण करणे पहिले कार्य मानले जाते. पण, या पोटात अन्नाशिवाय इतर काही साठू शकते का? तर त्याचे उत्तर हो, असे आता द्यावे लागेल. पश्‍चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून दीड किलो दागिने आणि नाणी बाहेर काढण्यात आली.

रामपूरहट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बुधवारी (ता.24) झालेल्या शस्त्रक्रियेत हा खजिना सव्वीस वर्षांच्या महिलेच्या पोटातून बाहेर आला. संबंधित महिला मानसिक रुग्ण आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाच व दहा रुपयांची 90 नाणी, साखळी, नाकातील चमकी, कानातील डूल, बांगड्या, पैंजण असे दागिने आणि घड्याळे पोटात आढळली, अशी माहिती रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख सिद्धार्थ विश्‍वास यांनी सांगितले. बहुतेक दागिने हे तांबे, पितळाचे असून, काही सोन्याचेही आहेत. 

या महिलेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार मारग्राम येथील त्यांच्या घरातून दागिने हरविले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलीकडे चौकशी करण्यात आली. पण, जेव्हा-जेव्हा तिला याबद्दल विचाले जात असे तेव्हा ती रडू लागे. ""माझी मुलगी मानसिक रुग्ण आहे. काही दिवसांपासून जेवण झाल्यानंतर ती उलट्या करीत असे. तिच्या भावाच्या दुकानातून तिला नाणी मिळाली होती. आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून होतो. दागिने व नाणी गिळली होती.

गेल्या दोन महिन्यांपासून ती आजारी होती. तिला आम्ही अनेक खासगी दवाखान्यांत नेले. तिच्यावर औषधोपचार सुरू असले, तरी प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. नंतर तिला सरकारी रुग्णालयात आणले. तिथे एक आठवडा चाचण्या घेतल्यानंतर डॉक्‍टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली,'' अशी माहिती या मुलीच्या आईने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT