Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh esakal
देश

Brij Bhushan Singh: सुप्रीम कोर्टाकडून FIRचे आदेश; बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या याचिकेची दखल घेत सुप्रीम कोर्टानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देखील सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलीस आजच त्यांच्यावर गुन्हा दाखल करतली अशी माहिती दिली. यानंतर बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Wrestler Protest Brij Bhushan Singh first reaction after Supreme Court orders for FIR)

बृजभूषण सिंह यांनी म्हटलं की, हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आहे. कोर्टानं आज जे काही ठरवलं आहे त्याचं मी स्वागत करतो. माझा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे. तपसादरम्यान जिथं गरज पडेल तिथं सहकार्य करण्याची माझी तयारी आहे.

दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात बृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलीस आजच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात FIR दाखल होणार हे निश्चित झालं आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी महिला खेळाडूंनी महासंघाकडे तीन महिन्यांपूर्वीच केल्या होत्या. चौकशीनंतर कारवाईचं आश्वासन त्यांना देण्यात आलं, पण अद्यापही कुठलीही कारवाई झाली नसल्यानं अखेर खेळाडूंना आंदोलनाचं पाऊल उचलावं लागलं. त्यामुळं गेल्या पाच दिवसांपासून ते दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत.

सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

आंदोलक खेळाडूंची याचिका सोमवारी सुप्रीम कोर्टाला प्राप्त झाली. या याचिकेत खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेची दखल घेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली असून आज सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांच्यावतीनं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी आजच बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT