Yogi governments big announcement for Agneepath Scheme Yogi governments big announcement for Agneepath Scheme
देश

सरकारची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा; पोलिस आणि इतर सेवांमध्ये प्राधान्य

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केल्यापासून विरोध सुरू झाला आहे. योजनेच्या माध्यमातून तरुणांच्या भविष्याशी खेळले जाणार आहे. यामुळे लष्कराची प्रतिष्ठाही कमी होणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अशात कालपासून योजनेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामुळेच उत्तर प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली आहे. (Yogi governments big announcement for Agneepath Scheme)

केंद्र सरकारने सैन्यात चार वर्षांच्या भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला तरुणांकडून चांगलाच विरोध केला जात आहे. गुरुवारी सकाळपासून विरोध वाढला आहे. बिहारपासून हरयाणापर्यंतच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कुठे गाड्या जाळल्या तर काही ठिकाणी ट्रेनचे रूळ उखडले.

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील युवकांचे निदर्शने पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांनी उत्तर प्रदेश सरकार, पोलिस आणि इतर सेवांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य (Preference) देणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांनी गुरुवारी ट्विट करून तरुणांनी कोणाच्याही सांगण्यात येऊ नये असे म्हटले आहे. अग्निपथ योजना तरुणांच्या जीवनाला नवे आयाम देण्याबरोबरच भविष्याला सुवर्ण आधार देईल, असेही ते म्हणाले.

तरुण मित्रांनो, अग्निपथ योजना (Agneepath Scheme) तुमच्या आयुष्याला नवे आयाम देईल तसेच भविष्याला सोनेरी आधार देईल. कोणाच्याही सांगण्यात येऊ नका. देशाची सेवा करण्याचा निश्चय करणारे आमचे अग्निवीर राष्ट्राचा अमूल्य निधी असेल आणि उत्तर प्रदेश सरकार अग्निवीरांना पोलिस आणि इतर सेवांमध्ये प्राधान्य देईल, असे योगी आदित्यनाथ ट्विटमध्ये म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT