CET News
CET News sakal
एज्युकेशन जॉब्स

CET News : पहिलीच सीईटी तोट्याची? ; यंदा प्रथमच बीबीए, बीसीए, बीएमएससाठी परीक्षा

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पुणे : आजवर बीबीए, बीसीए, बीएमएस या पदवी अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी देणे बंधनकारक आहे. याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने यंदा प्रवेश घटण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) असलेले या अभ्यासक्रमांचे नियंत्रण जसेच्या तसे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) देण्यात आले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना व्यावसायिक किंवा प्रोफेशनल अभ्यासक्रम म्हणून वलय तर प्राप्त झाले. त्याचबरोबर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे पात्रता परीक्षाही अनिवार्य झाली आहे. अभ्यासक्रमांची गुणवत्ता व दर्जाचा समन्वय राखण्यासाठी सीईटी या शैक्षणिक वर्षापासून बंधनकारक करण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करत विद्यार्थ्यांना सीईटीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या बद्दल पुरेशी जागरूकता आणि विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्याचा अभाव असल्याने सीईटीसाठी नोंदणी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये यासंबंधी मार्गदर्शन कक्ष असतानाही पालक आणि विद्यार्थ्यांचा त्याकडील ओढा कमी आहे. याचा सर्वाधिक फटका वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

शेवटच्या क्षणी निर्णय नको

आजवर सीईटी नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अगदी शेवटच्या टप्प्यात बीबीए, बीसीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांचा प्रवेश निश्चित करत होते. आता मात्र सीईटी अनिवार्य असल्याने या प्रक्रियेत नसलेल्या विद्यार्थ्यांना यापैकी एकाही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने सीईटीचा अर्ज भरून टाकावा, असे आवाहन महाविद्यालयांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

सीईटी च्या नोंदणीची शेवटची तारीख - ११ एप्रिल नोंदणीसाठी संकेतस्थळ - www.mahacet.org सीईटी परीक्षेची तारीख - २७ ते २९ मे २०२४

दर्जा सुधारण्यासह आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी एआयसीटीईचे नियंत्रण दीर्घकालीन फायद्याचे ठरणार आहे. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी देणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये यासंबंधी जागरूकता वाढायला हवी. यासाठी महाविद्यालयांत असलेल्या कक्षाचा उपयोग करून घ्यायला हवा.

- डॉ. श्वेता बापट, विभागप्रमुख, बीबीए, कावेरी कॉलेज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT