CET Exam Date 2024 : ‘सीईटी’चे सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
CET Exam Date 2024
CET Exam Date 2024sakal

पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार आता ‘सीईटी’च्या विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यानंतर देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेमुळे वेळापत्रक बदलण्याची वेळ ‘सीईटी सेल’वर आली. त्यानुसार आता सुधारित वेळापत्रक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेतील ‘पीसीबी’ गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिलदरम्यान; तर ‘पीसीएम’ गटाची परीक्षा दोन ते १७ मेदरम्यान होणार आहे. पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १८ मे रोजी परीक्षा घेण्यात येईल.

याआधी प्रवेश परीक्षा कक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सीईटी’ परीक्षेचे वेळापत्रक २२ मार्चला बदलले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजेच २४ मार्चला सीईटी सेलला पुन्हा एकदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता. ‘सीईटी’ आणि ‘नीट’ परीक्षा एकाच दिवशी येत होत्या. त्यामुळे सीईटी सेलला वेळापत्रकात बदल करावा लागला. त्यावेळी सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेसह अन्य सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलने संकेतस्थळाद्वारे जाहीर केले आहे.

सुधारित वेळापत्रक (परीक्षा : कालावधी)

  • एमएचटी-सीईटी : पीसीबी ग्रुप - २२, २३, २४, २८, २९ आणि ३० एप्रिल/ पीसीएम ग्रुप-२, ३, ४, ९, १०, ११, १५, १६, १७ मे २०२४

  • एमएएच-एएसी सीईटी : १२ मे

  • एमएएच-बी.ए/बी.एस्सी बी.एड (चार वर्ष इंटिग्रेटेड) सीईटी : १८ मे

  • एमएएच-एलएलबी सीईटी (पाच वर्ष) : १८ मे

  • एमएच-नर्सिंग सीईटी : २४ आणि २५ मे

  • एमएएच-बीएचएमसीटी सीईटी २२ मे

  • एमएएच- बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी : २७ ते २९ मे

  • ‘सीईटी सेल’चे संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com