HSC Exam 2024
HSC Exam 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Exam : राज्यातील १५ लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

नियमित, खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह श्रेणीसुधार योजनेअंतर्गत, आयटीआय आणि पुनर्परीक्षार्थी अशा एकूण बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत  विद्यार्थी संख्या ५६ हजार ६१६ ने वाढली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा आयोजित केली आहे. राज्यातील १० हजार ४९६ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यात तीन हजार ३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक उपस्थित होत्या. या परीक्षेसाठी आठ लाख २१ हजार ४५० विद्यार्थ्यांनी आणि सहा लाख ९२ हजार ४२४ विद्यार्थींनींनी नोंदणी केली आहे. एकूण १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके सज्ज -

- परीक्षेच्या काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यादृष्टीने मंडळामार्फत राज्यात २७१ भरारी पथके सज्ज

- प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत

- काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन

- विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची मंडळाकडून विनंती

- मंडळ सदस्य, शासकीय अधिकारी यांची परीक्षा केंद्रांवर होणार आकस्मिक भेट

परीक्षेचे दडपण दूर करण्यासाठी समुपदेशकांशी संवाद साधावा -

परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी नकारात्मक विचार किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येक दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. राज्य मंडळ व नऊ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -

तपशील : वर्ष- २०२२ : वर्ष-२०२३ : वर्ष-२०२४

एकूण विद्यार्थी : १४,७२,५७४ : १४,५७,२९३ : १५,१३,९०९

खासगी विद्यार्थी : २९,०१४ : ३४,००१ : ३९,५८७

श्रेणीसुधार योजनेअंतर्गत : ११५ : २,८९८ : ८,४३६

आयटीआय : ८७० : ३,२६१ : ४,७५०

पुनर्परीक्षार्थी : २९,११६ : २७,२०२ : ३१,२५६

विद्यार्थ्यांसाठी सूचना -

- परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोचणे आवश्यक

- परीक्षेसाठी नियोजित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला आहे.

- प्रवेशपत्र (हॉलतिकिट) आणि उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन, पालन करावे

परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये -

- एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत (ता.२०) अर्ज स्वीकारण्यात आले.

- प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाचे सहाय्यक परिरक्षक (रनर) यांच्या सहाय्याने चित्रीकरण आणि जीपीएस प्रणालीद्वारे होणार ट्रॅकिंग

बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -

- एकूण विद्यार्थी : १५,१३,९०९

- विद्यार्थी : ८,२१,४५०

- विद्यार्थिनी : ६,९२,४२४

शाखानिहाय परीक्षार्थींची संख्या -

शाखा : नोंदणी केलेले विद्यार्थी

विज्ञान : ७,६०,०४६

कला : ३,८१,९८२

वाणिज्य : ३,२९,९०५

व्यावसायिक अभ्यासक्रम : ३७,२२६

आयटीआय : ४,७५०

परीक्षार्थींसाठी हेल्पलाइन क्रमांक -

- राज्य मंडळ स्तरावरील दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५७०५२७१ आणि ०२०-२५७०५२७२

- विभागीय मंडळ स्तरावर : ७०३८७५२९७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT