India Post 
एज्युकेशन जॉब्स

India Post Recruitment: पोस्ट खात्यात 44,228 पदांसाठी 'मेगा भरती'; 5 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

भारतीय पोस्ट खात्यात मेगा भरती होणार असून याचं नोटिफिकेशन नुकतंच या खात्यानं प्रसिद्ध केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

India Post GDS Notification 2024 : भारतीय पोस्ट खात्यात मेगा भरती होणार असून याचं नोटिफिकेशन नुकतंच या खात्यानं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार ग्रामीण डाक सेवा (GDS) या पदासाठी ही भरती असणार आहे. यासाठी १५ जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ५ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. यासाठी indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येईल. (India Post Mega recruitment for 44228 Posts Apply before August 5)

यासाठी देशभरात एकूण ४४,२२८ जागा असून यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, इशान्य ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या २२ राज्यांचा समावेश आहे.

पोस्ट कुठली अन् पगार किती?

ग्रामीण डाक सेवक अंतर्गत

१) ब्रान्च पोस्ट मास्टर (BPM) - पगार 10,000 ते 29,380 रुपये

२) असिस्टंट ब्रान्च पोस्ट मास्टर (ABPM) - पगार 10,000 ते 24,470 रुपये

पात्रता काय?

दहावी पास झालेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. यासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी १० वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या मेरिटवर निवड केली जाणार आहे.

  • गणित आणि इंग्रजी विषयांसह दहावी पास.

  • स्थानिक भाषेचा १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश असावा.

    वय -

  • १८ ते ४० वर्षे

इतर शिक्षण -

  • कॉम्प्युटरचं ज्ञान

  • सायकल चालवायला यायला हवी

  • उपजीविकेचं पुरेस साधन असायला हवं

नोटिफिकेशन आणि अर्ज भरण्याच्या लिंक

India Post GDS Notification Download

India Post Online Registration Link

India Post GDS Application Form Link

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मुलगा निघाला 'लफडेबाज'; घरकाम करणाऱ्या महिलेवर जबरदस्ती अन् नंतर...

Crime News : लग्नास नकार, महिलेने सुडातून एक्स बॉयफ्रेंडच्या पत्नीला टोचले एचआयव्हीचे इंजेक्शन, 'असा' झाला खुलासा

Republic Day Sale: वॉव! प्रजासत्ताक दिनानिमित्त 'या' ब्रॅण्डवर आहे मोठी सूट, कपड्यांवर 70 टक्के डिस्काऊंट

Latest Marathi news Live Update : पठाणकोट एक्सप्रेसला दहा दिवसात थांबा द्या, अन्यथा रेलरोको आंदोलन करणार

बापरे! हृतिक रोशनला झाली गंभीर दुखापत, नीट चालताही येईना, viral video पाहून चाहत्यांना लागली काळजी

SCROLL FOR NEXT