relationship between body and mind
relationship between body and mind sakal
एज्युकेशन जॉब्स

शरीर-मनाचे अतूट नाते

डॉ. मिलिंद नाईक

तुम्ही कधी रात्रभर न झोपता जागे राहिला आहात का? एक तर रात्रभर जागणे अतिशय कठीण गोष्ट असते, पण प्रयत्नपूर्वक तसे केलेच, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली स्थिती अत्यंत वाईट झालेली असते. आपण कुठे आहोत? काय करत आहोत? दिवस आहे की रात्र? असा आपला गोंधळ उडालेला असतो. कधी एकदा झोपतो असे आपल्याला झालेले असते.

आपल्या शरीराची आणि मनाची झीज भरून काढणारी झोप ही एक अफलातून गोष्ट आहे. ज्यांना नीट झोप मिळत नाही किंवा ज्यांची झोप सलग होत नाही, त्यांना काही काळानंतर उदासीनता, चिडचिडेपणा, कामात लक्ष न लागणे अशा समस्या जाणवायला लागतात.

ताणाचा शरीरावरील परिणाम

शरीर मनाचे काही तरी अतूट नाते आहे. काही वेळेला उलटेही घडते. भीतीने तोंड कोरडे पडते, हातपाय कापतात, चिंतेने छातीत धडधडते, अंगाला घाम सुटतो, रागाने मुठी वळतात, आनंदाने डोळे भरून येतात, दुःखाने डोके जड होते, म्हणजेच भावनांचा शरीरावर परिणाम होतो. लहानपणी ऐकलेल्या बालगीतांमध्ये ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणे तुम्ही ऐकले असेल.

त्यात तो छोटा मुलगा म्हणतो ‘भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर. पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?’ अशा प्रकारे आजारी पडून परीक्षा बुडवण्याची इच्छा तो व्यक्त करतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत ते ढोंग नसते. तणावाचा शरीरावरती परिणाम होतो. खूप ताण असलेल्या लोकांना पचनसंस्थेचे विकार, त्वचेचे विकार, रक्तदाब वाढणे असे आजार होऊ शकतात. शरीर आणि मन यांचे नाते घट्ट असते.

मनाची शक्ती

डॉ. व्हिक्टर फ्रँकेल नावाचे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. ते ज्यू असल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना एका छळछावणीत डांबण्यात आले होते. तिथे आयुष्य इतके भयंकर होते की, कोणीही माणूस क्षणार्धात खचून जावा. अपरंपार कष्ट, शारीरिक छळ, उपासमार आणि मृत्यूची सतत भीती अशा वातावरणात फ्रँकेल तगून राहिले आणि अखेर सुटलेसुद्धा.

त्यांनी असे लिहून ठेवले आहे की, नाझी सैनिकांनी माझे सर्व काही लुटले - पळवले - हिसकावले. त्यांना नेता नाही आली ती एकच गोष्ट ती म्हणजे माझे धैर्य! त्या छळछावणीतल्या मन खचवणाऱ्या प्रसंगातसुद्धा फ्रँकेल मनाने खंबीर राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातही असे प्रसंग आपल्याला दिसतात.

अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना मनाच्या अफाट शक्तीमुळे ते टिकून राहिले. एवढेच नाही, तर आपण पाहतो की, साधे क्रिकेट वा इतर खेळ खेळत असताना अनेक खेळाडूंना गंभीर दुखापती होतात, पण चांगले खेळाडू त्या दुखापतींकडे दुर्लक्ष करून आपला खेळ पूर्ण करतात. त्यासाठीही अफाट मानसिक शक्ती लागते.

व्यायाम

व्यायामाने मन प्रफुल्लित होते. आपला मूड गेला असेल, तर व्यायामानंतर पुन्हा एकदा काम करावेसे वाटू लागते. त्यामुळेच अनेक मानसिक रोगांवर व्यायाम हा उत्तम उपाय सांगितला गेला आहे. भारतीय शास्त्रांमध्ये योगासने व प्राणायाम हे तर सर्वोत्त्तम उपाय सांगितले आहेत. व्यायामाने मेंदूमधील पेशींमध्ये एंडॉर्फिन नावाचे रसायन पाझरायला लागते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला एकदम ताजतवानं, प्रसन्न वाटतं. उत्साह द्विगुणित होतो.

वरीलपैकी कोणकोणत्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात? कोणत्या मानसिक गोष्टींचा तुमच्या शरीरावरसुद्धा परिणाम होतो? कधी अशा प्रकारे स्वतःकडे वळून बघितले आहे का? नसेल तर आवर्जून बघा. निरीक्षणे नोंदवा. काही गोष्टी सरावाने दूर करता येतात. मात्र, प्रयत्न करूनसुद्धा फारशा सुधरत नाहीत. तिथे मानसतज्ज्ञांची, शिक्षकांची मदत घ्या. स्वतःचे असे निरीक्षण करणे जीवनकार्य निवडण्यासाठी महत्त्वाचे आहे.

सैन्यदलात भरती व्हायचे असेल, खेळाडू व्हायचे असेल, चांगला वक्ता व्हायचे असेल, तर मनांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांवर मात करावी लागते. अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रांत ‘ताणाचे’ वातावरण आहे. त्यामुळे ताणावर वरताण होता आले, तरच उच्च पदांवरील कामे नीट करता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT