JEE mains exam
JEE mains exam esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main Exam Result : महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत केला १०० एनटीए स्कोअर

मीनाक्षी गुरव

पुणे - नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या पहिल्या सत्रातील ‘जेईई मेन २०२४’ परीक्षेचा निकाल मंगळवारी पहाटे जाहीर करण्यात आला. या परीक्षेत २३ विद्यार्थ्यांनी १०० एनटीए स्कोअर मिळविला आहे. यात महाराष्ट्रातील आर्यन प्रकाश, नीलकृष्ण गाजरे आणि दक्षेश मिश्रा या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एनटीएच्या वतीने ‘जेईई मेन’ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाते. त्यानुसार पहिल्या सत्रातील पेपर एक (बी.ई./बी.टेक) २७, २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या कालावधीत झाली. देशातील १२ लाख २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ११ लाख ७० हजार ४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम्‌, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये घेण्यात आली.

पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा देश- परदेशातील एकूण २९१ शहरांमधील ५४४ केंद्रांवर घेण्यात आली. परदेशातील २१ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तर अबुधाबी, हाँगकाँग आणि ओस्लो (देश- नॉर्वे) या शहरांमध्ये ही परीक्षा यंदा पहिल्यांदाच घेण्यात आली. बी. आर्च आणि बी. प्लॅनिंगसाठी जेईई मेन अंतर्गत पेपर दोन ही परीक्षा घेण्यात आली या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -

- www.nta.ac.in

- https://jeemain.nta.ac.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT