MBA Entrance Exam
MBA Entrance Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : एमबीए प्रवेश परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

- के. रवींद्र

मागील लेखात कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट-२०२३ बद्दल माहिती घेतली, आपण आजच्या लेखात इतर प्रवेश परीक्षांबद्दल माहिती घेऊया.

झेविअर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (XAT)

XAT २०२३ ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे, झेविअर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (XAT) ही XLRI जमशेदपूरद्वारे आयोजित राष्ट्रीय-स्तरीय अभियोग्यता चाचणी आहे. एमबीए/पीजीडीएम प्रवेशांसाठी ही सर्वांत जुनी आणि दुसरी सर्वांत मोठी परीक्षा आहे. XAT परीक्षा भारतातील ८० पेक्षा अधिक शहरांमध्ये घेतली जाईल. XAT चे गुण XLRI जमशेदपूर आणि इतर झेविअर असोसिएट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील प्रवेशांसाठी वैध असतील. या व्यतिरिक्त, देशभरातील १४० हून अधिक प्रीमियम बी-स्कूलद्वारे स्कोअर स्वीकारले जातात.

या एमबीए प्रवेश परीक्षेवरील सर्व XAT महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, पेपर पॅटर्न आणि बरेच काही येथे तपासा.

पात्रता निकष - XAT पात्रता २०२४ मध्ये नोंदणी करण्यासाठी आणि परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पदवीच्या कोणत्याही शाखेत किमान टक्केवारीची आवश्यकता नाही, तर इतर परीक्षांमध्ये बॅचलर पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. किमान तीन वर्षांची पदवी पदवी घेतली असेल किंवा करत असेल.

पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

नोंदणी - ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत

परीक्षा दिनांक - रविवार ७ जानेवारी २०२४

परीक्षेची पद्धत - संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा

XAT अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

उमेदवाराचा स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो.

उमेदवाराने बरोबर नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक आणि ईमेल पत्ता देणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तपशीलात बदल करता येत नाहीत. परीक्षा नोंदणीसाठी वरील सर्व माहिती आवश्यक आहे.

XLRI मधील एमबीए प्रोग्रॅमसाठी परीक्षा नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया.

XAT अर्जाच्या तपशिलांमध्ये शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही बदलांना परवानगी दिली जाणार नाही.

नोंदणी आणि अर्जामध्ये तुम्ही भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.

महत्त्वाच्या लिंक

https://xatonline.in/registration

https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT