BSF Job google
एज्युकेशन जॉब्स

BSF Job : बीएसएफमध्ये भरती, लाखो रुपये मिळणार पगार; अर्ज करण्यासाठी फक्त २ दिवस

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २८ जानेवारी २०२३ पूर्वी या पदांसाठी अर्ज करावा लागेल. या भरतीतून एकूण २० पदे भरली जाणार आहेत.

नमिता धुरी

मुंबई : सीमा सुरक्षा दल (BSF) ने पशुवैद्यकीय सहाय्यक शल्यचिकित्सक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट देऊन अर्ज भरता येईल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २८ जानेवारी २०२३ पूर्वी या पदांसाठी अर्ज करावा लागेल. या भरतीतून एकूण २० पदे भरली जाणार आहेत. हेही वाचा - ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - २०

महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ जानेवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीव्हीएससी पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी, वेबसाइटला भेट देऊन भरती अधिसूचना वाचा.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २३ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेतून जावे लागेल.

अर्ज प्रक्रिया

अर्ज करणार्‍या सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ४०० रुपये भरावे लागतील. यासोबतच SC, ST सारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना ५६ हजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये वेतन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : महागाईविरोधात भंडाऱ्यात शिवसेना (उबाठा)चा एल्गार; इंधन व गॅस दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन

पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

"आपण का भीक मागायची त्यांच्याकडे?" सुकन्या मोने यांनी उघड केलं हिंदी मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT