Government Job : १०वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; ३५ हजारांपर्यंत मिळणार पगार

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उद्यापासून २१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी आहे.
Government Job
Government Jobgoogle

मुंबई : वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडने खनन सरदार आणि सर्वेक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून दहावी पाससह काही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.

एकूण १३५ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यात खनन सरदाराच्या १०७ तर सर्वेक्षकाच्या २८ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी आहे. हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय ?

Government Job
Republic Day : २६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण का करणार नाहीत ?

शैक्षणिक पात्रता -

खनन सरदार – खनन सरदार प्रमाणपत्रासह १०वी उत्तीर्ण किंवा खाण आणि सर्वेक्षण पदविका.

सर्वेक्षक - सर्वेक्षकाचे प्रमाणपत्र किंवा खाण आणि सर्वेक्षण डिप्लोमासह १०वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा

तुमचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही WCL भरतीसाठी अर्ज करू शकता.

पगार

खनन सरदार पदावर नोकरी मिळाल्यानंतर, उमेदवाराला दरमहा ३१ हजार ८५२ रुपये पगार मिळेल. दुसरीकडे, सर्वेक्षक पदांसाठी हे वेतन ३४ हजार ३९१ रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे.

Government Job
Army Recruitment : वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची संधी

निवड प्रक्रिया

या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.

अर्ज कसा करावा ?

अर्ज करण्यासाठी WCL च्या अधिकृत वेबसाईट westerncoal.in ला भेट द्या. आता होम पेजवर दिलेल्या मायनिंग सरदार आणि सर्वेयर रिक्रूटमेंटच्या लिंकवर क्लिक करा. नवीन नोंदणी केल्यानंतर, सर्व तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी जमा करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com