Mahesh Bhagwat
Mahesh Bhagwat Sakal
एज्युकेशन जॉब्स

‘यूपीएससी’त शंभर नंबरी यश

सकाळ वृत्तसेवा

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश एम. भागवत आणि त्यांच्या टीमने मोठी कामगिरी केली आहे.

पुणे - स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश एम. भागवत आणि त्यांच्या टीमने मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) नुकतेच यश मिळविले आहे. या टीमने या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले असून त्यांची यशोगाथा कौतुकास्पद आहे. भागवत हे सध्या हैदराबादमधील रचकोंडाचे पोलिस आयुक्त आहेत.

ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या टॉप शंभरच्या रॅंकर्समध्ये महाराष्ट्रातील १३व्या क्रमांकावर असलेल्या प्रियंवदा म्हाडदळकरसह १६ उमेदवारांना भागवत यांनी प्रशिक्षण दिले होते. त्याचप्रमाणे १०१ ते ६८५ मधील रँक असलेल्या ८३ हून अधिक उमेदवारांना भागवत आणि त्यांच्या टीमने मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले होते. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे.

दरवर्षी मुख्य परीक्षेनंतर भागवत हे त्यांच्या मार्गदर्शकांच्या टीमसह भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय महसूल सेवा विभागांसाठी अधिकारी आणि विषय तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी विनामूल्य प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण नागरी सेवा इच्छुकांसाठी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दिले जाते. केवळ दोन तेलुगू भाषिक राज्यांतच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, आसाम, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारही त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असतात.

भागवत यांच्यासह या मार्गदर्शक टीममध्ये डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नितीश पाथोडे, आनंद पाटील, सुप्रिया देवस्थळी, निळकंठ आव्हाड, समीर उन्हाळे, राजीव रानडे, विवेक कुलकर्णी, अभिषेक सराफ, मुकुल पाटील, सतविन कुलकर्णी, सतीश पाटील, डॉ. इंगवले, अनुदीप दुरीशेट्टी, साधू नरसिंहा रेड्डी, पी श्रीजा, नीलकंठ आव्हाड आदींचा समावेश आहे.

मी यूपीएसी परीक्षेचा अभ्यास करीत असताना मला अनेक अडचणी आल्या. त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, यासाठीच ही धडपड आहे. हे काम मी एकटा करीत नसून माझे सहकारीही खूप मेहनत घेत आहेत.

- महेश भागवत, पोलिस आयुक्त, रचकोंडा (हैदराबाद)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालामध्ये पहिल्या शंभरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. त्यासाठी आम्ही व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत आहोत.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक आंतरराष्ट्रीय संबंध, मुंबई विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT